पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या भक्तांनी ट्विटरवर केला पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचा व्यापक प्रसार !
सध्या रामनाथी, फोंडा, गोवा येथे पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन चालू आहे. २४ जून २०१६ या दिवशी पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या देशभरातील भक्तांनी ट्वीटर या सामाजिक संकेतस्थळावर या अधिवेशनाचा व्यापक प्रमाणात प्रसार केला. २४ जून या दिवशी दिवसभरात अधिवेशनाच्या संदर्भात करण्यात आलेल्या ‘ट्वीट्स’मध्ये (ट्वीट म्हणजे ट्विटरवर लिहिला जाणारा संदेश. असा संदेश आपण आपल्या खात्यावर ठेवल्यास तोे आपल्या खात्याच्याशी संलग्न असणार्यांना दिसतो.) #5thHinduAdhiveshan असा ‘हॅश टॅग’ (चर्चिल्या जाणार्या विषयाचा संदर्भ) वापरण्यात आला होता. दिवसभरात ट्विटरवर भारतामध्ये सर्वाधिक चर्चिल्या जाणार्या विषयांमध्ये हिंदू अधिवेशनाचा विषय सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास चौथ्या क्रमांकावर पोहोचला होता. हा ‘हॅश टॅग’ चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर बराच वेळ टिकून होता. लक्षावधी लोकांपर्यंत पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचा विषय पोचला आहे, असा अंदाज ट्विटरच्या माध्यमातून धर्मसेवा करणार्या पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या एका भक्ताने व्यक्त केला.