Menu Close

नेपाळी हिंदूंच्या वतीने जागृत नेपाळी संघटने कडून हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचा सन्मान

विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा : नेपाळ पुनश्‍च हिंदु राष्ट्र व्हावे, या नेपाळी हिंदूंच्या मागणीला अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या माध्यमातून देशभरातील हिंदुत्वनिष्ठांनी ठाम पाठिंबा दिला आहे. या हिंदू अधिवेशनामध्ये नेपाळमधील हिंदुत्ववादी सहभागी होत आहेत. पाचव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी नेपाळमधील ९४.२ टक्के लोकसंख्या असलेल्या हिंदूंच्या वतीने आणि जागृत नेपाळी संघटनेच्या वतीने हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्यरत अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या आयोजक संस्था हिंदु जनजागृती समिती अन् सनातन संस्था, तसेच भारतातील समस्त हिंदुत्ववादी यांचा भगवान बुद्धाची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू.(डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी या सन्मानाचा स्वीकार केला.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *