Menu Close

श्रीलंका येथील श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन् यांनी गाठला ६४ प्रतिशत आध्यात्मिक स्तर

विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा : श्रीलंकेतील हिंदूंच्या रक्षणासाठी तळमळीने कार्य करणारे श्रीलंका येथील श्री. सच्चिदानंदन् यांनी ६१ टक्के आध्यात्मिक स्तर प्राप्त केला असल्याचे गत चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनामध्ये घोषित करण्यात आले होते. धर्मबंधुत्वाची भावना असणारे आणि हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी उतारवयातही कार्यरत असणारे श्री. सच्चिदानंदन् यांनी ६४ टक्के आध्यात्मिक स्तर गाठल्याचे अधिवेशनाच्या दरम्यान घोषित करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू.(डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते पुष्पहार घालून आणि श्रीकृष्णाची प्रतिमा भेट देऊन श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन् यांचा सत्कार करण्यात आला.

श्रीलंका येथील हिंदूंची स्थिती दयनीय आहे. त्यामुळे श्रीलंका येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. सच्चिदानंदन् यांनी त्यांच्या कुटुंबासहित ऑस्ट्रेलिया येथे स्थायिक होण्याचे ठरवले होते; पण हिंदु धर्माप्रतीच्या अभिमानामुळे अन् श्रीलंकेतील हिंदूंच्या रक्षणासाठी त्यांनी श्रीलंकेतच रहाण्याचा निर्णय घेतला. त्यांचे वय आता ७५ वर्षे असून या वयातही ते त्यांची सर्व कामे स्वतःच करतात. त्यांच्यात नम्रता आहे. ते सतत वर्तमानकाळात असतात. त्यांनी श्रीलंकेतील १० ते १५ धर्मविरांना हिंदु धर्मप्रसार आणि साधना शिकण्यासाठी, तसेच हिंदुत्वरक्षणाचे कार्य शिकण्यासाठी रामनाथी येथील सनातन आश्रमात पाठवण्याचे ठरवले आहे. यासंदर्भात श्री. सच्चिदानंदन् श्रीलंकेत असल्याने तेथील हिंदूंची काळजी मिटली, अशा शब्दांत सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *