माननीय महोदय,
मी पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकलो नाही; मात्र विविध क्षेत्रांतून आलेल्या धर्माभिमान्यांच्या ज्ञानवर्धक मार्गदर्शनाचा लाभ घेण्यास माझा जिज्ञासू आत्मा आपल्यासह तेथेच उपस्थित आहे. विविध विषयांवर होणार्या गटचर्चेमुळे हे विषय दैनंदिन जीवनाचा भाग होतात, ही गटचर्चांची सार्थकता आहे. यामुळे समाजातील अनेक सर्वसामान्य लोकही जागृत आणि कृतीशील होत आहेत.
१. हिंदु धर्माभिमान्यांना प्रोत्साहन देऊन कृतीप्रवण करणारे हे हिंदू अधिवेशन अतुलनीय
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून गेल्या ५ वर्षांत अत्यंत भव्य आणि उत्साहवर्धक पद्धतीने आयोजित केलेल्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनामुळे देश-विदेशातून आलेल्या निरनिराळ्या धर्माभिमान्यांना एका धाग्यात गुंफण्याचे कार्य होत आहे. यामुळे भारताला हिंदु राष्ट्र करण्याचा संकल्प व्यापक होत आहे. परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या प्रेरणेने हिंदु धर्माभिमान्यांना प्रोत्साहन देऊन कृतीप्रवण करणारे हे अधिवेशन अतुलनीय आहे.
२. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करणार्या साधकांमुळे अधिवेशनातील सकारात्मक बनलेले वातावरण
व्यक्तीमत्त्व घडवण्यामध्ये स्वयंशिस्त हा अविभाज्य गुण आहे. सनातन संस्थेच्या प्रत्येक साधकात याची अनोखी झलक अनुभवायला मिळाल्यामुळे अधिवेशनातील वातावरणामध्ये पुष्कळ उर्जा निर्माण होते. सर्वांच्या मुखावर असणारे एकसारखे भाव आणि सर्वांचे समान आचरण अलौकिक आहे. येथे जीवनाला विनाशाकडे नेणार्या अहंकाराचा भास दूर दूरपर्यंत होत नाही. अशा अद्भूत आणि प्रेरणादायी वातावरणात होणार्या आयोजनामध्ये सहभागी व्हावे, असे कोणाला वाटणार नाही ?
२. हिंदू अधिवेशनाचे महत्त्व कुंभपर्वाइतके श्रेष्ठ !
माझ्यासाठी या अधिवेशनाचे महत्त्व कुंभपर्वाच्या यात्रेपेक्षा अल्प नाही. एका महत्त्वाच्या कार्यामध्ये व्यस्त असल्याने मी अधिवेशनाला उपस्थित राहू शकलो नाही. धर्मावर होणार्या आघातांविषयी सतत सतर्क राहून समाजालाही त्याविषयी जागृत करणे, हा माझा दिनक्रम आहे. यासाठी लेखनाच्या माध्यमातून गेली ३० वर्षे, तसेच सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून गेल्या ४ वर्षांपासून मी कार्य करत आहे. प्रतिवर्षी माझ्या सहकार्यांसह मी छोट्या-मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करतो. यामध्ये हिंदूंवर होणार्या अनेक आघातांविषयी चर्चा करून हिंदूंना धर्मांधांसंदर्भात सतर्क आणि जागृत करत आहे. यामुळे माझ्या संपर्कात असलेले विविध हिंदुत्ववादी संघटनांचे युवा कार्यकर्ते अधिक सक्रीय होत आहेत.
३. अधिवेशनाला उपस्थित धर्मविरांना नमस्कार !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध शहरांमध्ये करण्यात येणारे मासिक (राष्ट्रीय) हिंदू आंदोलन ही निद्रिस्त असलेल्या हिंदू समाजाला जागृत करण्याची एक प्रभावी मोहीम आहे. अधिवेशनासाठी आलेल्या सर्व धर्माभिमान्यांना आणि सनातन संस्थेच्या सर्व धर्मविरांना माझा सप्रेम नमस्कार !
राष्ट्र आणि धर्म सेवेत….
आपला धर्मबंधू,
श्री. विनोद कुमार सर्वोदय,
अध्यक्ष, सांस्कृतिक गौरव संस्थान,
गाझियाबाद, उत्तरप्रदेश