Menu Close

राजकारणात शिरण्यापेक्षा निर्भयतेने धर्मकार्य करा ! – आमदार टी राजासिंह, तेलंगण

प्रचंड घोषणांच्या गजरात हिंदूसिंह टी राजासिंह यांना उपस्थित हिंदुत्वनिष्ठांकडून अभिवादन !

t_rajasingh
आमदार टी राजासिंह, तेलंगण

विद्याधिराज सभागृह, रामनाथी (गोवा) : राजकारण हे महामार्गावरील कचराकुंडीप्रमाणे आहे. राजकारणात शिरल्यानंतर धर्मकार्य करण्यासाठी अनेक बंधने येतात. राजकारणात गेल्यावर गुलाम बनावे लागते. पूर्वीच्या आणि आताच्या राजकारणात पुष्कळ भेद आहे. पूर्वी तत्त्वांच्या आधारे राजकारण केले जात होतेे; आज मात्र ही परिस्थिती पालटली आहे. त्यामुळे राजकारणात जाण्याचा विचार न करता निर्भयपणे धर्मकार्य करत रहा. जो धर्मकार्य करतो, त्याचे साक्षात् ईश्‍वर रक्षण करतो, असे आवाहन आमदार टी राजासिंह यांनी केले. ते रामनाथी (गोवा) येथे चालू असलेल्या पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सिरोही संस्थान, राजस्थानचे महाराजाधिराज महाराव रघुवीरसिंहजी बहादूर, भोपाळ (मध्यप्रदेश) येथील धर्मपाल शोध पिठाचे संचालक प्रा. रामेश्‍वर मिश्र आदी मान्यवर उपस्थित होते. ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा अनोखा संगम असलेले टी राजासिंह यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी सभागृह घोषणांनी दणाणून गेले. त्यांच्या व्यासपिठावरील उपस्थितीनेही सभागृहात हिंदुत्वाचे चैतन्य सळसळत होते. हिंदुत्वनिष्ठ विचारांना कृतीची जोड असल्यामुळे हिंदूंचे सिंहच असणारे श्री. राजासिंह यांच्या मार्गदर्शनाने उपस्थितांमध्ये हिंदुत्वाचे स्फुल्लिंग चेतवले. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही टी राजासिंह यांचे मार्गदर्शन संस्मरणीय ठरले.

आमदार बनल्यानंतर बर्‍याच वेळेला हिंदुत्वाचे कार्य बंद झाल्याचे आढळून येते; पण टी राजासिंह याला अपवाद आहेत. आमदार झाल्यानंतरही त्यांचे हिंदुत्वरक्षणाचे कार्य अविरत चालू आहे. यासाठी त्यांचा पू. डॉ. चारूदत्त पिंगळे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

t_rajasingh_satkar

आमदार टी राजासिंह यांच्या क्षात्रतेजयुक्त मार्गदर्शनातील वाग्बाण

१. काही दिवसांपूर्वी उस्मानिया विद्यापिठात गोमांस उत्सव आयोजन करण्यात आले होते. मतांच्या राजकारणासाठी झुकत तेथील स्थानिक राज्यकर्त्यांनीही या उत्सवाला कोणताही विरोध नसल्याचे मत प्रदर्शित केले. त्या वेळी आम्ही या गोमांस उत्सवाला प्रखर विरोध दर्शवला. गोमांस उत्सव आयोजित केल्यास आम्ही डुक्करमांस उत्सवही त्याच भागात आयोजित करू, अशी चेतावणी दिली. हिंदूंनी या उत्सवाला प्रखर विरोध दर्शवल्यानंतर अखेर शासनाला तो उत्सव रहित करणे भाग पडले. हा हिंदूंचा मोठा विजय होता.

२. १०० कोटी हिंदूंमध्ये केवळ काही जणांच्याच नशिबात धर्मकार्य आहे. कीडा-मुंगीसारखे जीवन तर कित्येक जण जगतात. देवाने आपल्याला धर्मकार्य करण्यासाठी निवडले असल्याने आपण भाग्यशाली आहोत.

३. केवळ हिंदूंच्या मतांवर मी आमदार म्हणून निवडून आलो. मी प्रसार करतांनाही मला मुसलमान आणि ख्रिस्ती यांनी मते नको, असे सांगायचो. माझ्याकडे धनाची नाही, तर धर्माची शक्ती असल्याने मी ५० सहस्र मताधिक्याने निवडून आलो. अन्य राजकारणी मात्र सर्वप्रथम मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्या मतांवर डोळा ठेवतात. वर्ष २०१९ मध्ये पुढील निवडणूक आहेत. अजून ३ वर्षे शिल्लक आहेत. या उर्वरित काळात मुल्ला-मौलवींना धडा शिकवू.

४. हिंदुत्वावरील आघातांना विरोध करण्यासाठी आपापल्या क्षेत्रात युवकांचे मोठे संघटन निर्माण करा.

५. आपल्याला एक ना एक दिवस मरायचेच आहे. मग आजारी पडून अथवा अपघातात मरण्यापेक्षा धर्मकार्य करतांना मरणे श्रेयस्कर आहे. मरण्यापूर्वी असे कार्य करा, की जे अजरामर होईल. धर्म आणि राष्ट्र यांच्या रक्षणासाठी लढणारे लढवय्ये निर्माण करा.

६. भारत माता की जय म्हणणार नाही, असे ओवैसीकडून वक्तव्य केले गेले. दुर्दैवाने राजकारणासाठी हिंदूंकडूनच त्यांना अशी वक्तव्ये करण्यासाठी पैसे पुरवले जातात, हे कटू सत्य आहे.

हिंदूंचे शासन असूनही हिंदूंवर अन्याय का ?

हिंदुत्ववादी म्हणवणारा भाजप सत्तेत असतांनाही हिंदूंच्या दुःस्थितीत सुधारणा होत नसल्यासंदर्भात खंत व्यक्त करत आमदार टी राजासिंह पुढे म्हणाले, आज साधूसंतांना खोट्या आरोपांखाली कारागृहात डांबले जात आहे. लव्ह जिहाद, धर्मांतर करणार्‍यांवर नाही, तर ते रोखणार्‍या हिंदूंवरच कारवाई केली जात आहे. आज भाजप शासनाला सत्तेत येऊन २ वर्षे पूर्ण झाली; पण या दोन वर्षात हिंदूंवरील अन्याय कमी होण्याऐवजी त्यात वाढच झाली आहे. हिंदूंचे शासन असूनही हिंदुत्वावर हा अन्याय कशासाठी ?

हिंदूहिताच्या घोषणा पूर्ण करण्यासाठी केलेले सत्ताधारी पक्षाला केलेले आवाहन

राजकीय पक्षांकडून केवळ निवडणुकीपूर्वीच श्रीराममंदिराचे निर्माण आणि अन्य हिंदूहिताची सूत्रे उपस्थित केली जातात. एकदा ही सूत्रे पूर्ण करून, तर पहा. एकदा अयोध्येत भव्य श्रीराममंदिर बनवून तर पहा, लव्ह जिहाद करणार्‍यांना फासावर चढवून तर पहा, हिंदूंचे तुम्हाला पूर्ण समर्थन मिळेल. समाजात वेगळे बोलणे, मनामध्ये काही वेगळेच असणे, असे कुठपर्यंत करत रहाणार ?

हिंदु जनजागृती समितीच्या संकेतस्थळावरील क्रांतीकारकांच्या माहितीसंदर्भात काढलेले गौरवोद्गार

हिंदु जनजागृती समिती घराघरात छत्रपती शिवाजी महाराज निर्माण करण्याचे कार्य करत आहे. आपल्याला योद्धे निर्माण करायचे असतील, तर क्रांतीवीरांचा इतिहास आपल्याला माहीत असायला हवा. हिंदु जनजागृती समितीने त्यांच्या संकेतस्थळावर क्रांतीवीरांविषयीची माहिती उपलब्ध करून दिली आहे. ती वाचल्यानंतर तुम्ही वीर बनाल.

धर्मकार्य कसे करावे ?, प्रसिद्धीमाध्यमांशी कसे बोलायचे ?, समाजात कसे मिसळायचे ? याविषयी सनातन संस्था मार्गदर्शन करत आहे. या अधिवेशनांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रातांतील, वेगवेगळ्या भाषांच्या हिंदुत्ववाद्यांना एकत्र करणार्‍या गुरुजींच्या चरणी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी) कृतज्ञतापुष्प अर्पण करतो.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *