विद्याधिराज सभागृह, रामनाथी, गोवा : काठमांडू (नेपाळ) येथील सनातन हिंदु मोर्च्याचे अध्यक्ष डॉ. माधव भट्टराय म्हणाले, युरोपीय लोकांच्या प्रभावाखाली येऊन नेपाळी हिंदूंची संस्कृती नष्ट करण्यासाठी नेपाळला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित करण्यात आले. धर्मनिरपेक्ष नेपाळ असे घोषित करून हिंदु राष्ट्राची मागणी करणार्या नेपाळी हिंदूंच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी संविधानात आम्ही सनातन हिंदु धर्माचे रक्षण करू असे वाक्य घालण्यात आले आहे. हा विरोधाभास ही शुद्ध फसवणूक आहे; कारण जेव्हा नेपाळमध्ये संविधानाविषयी जनमत घेण्यात आले, त्या वेळी ८५ प्रतिशत हून अधिक नेपाळी जनतेने नेपाळ हिंदु राष्ट्रच असावे, असा कौल दिला; पण हा कौल डावलत नेपाळला धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आले.
डॉ. भट्टराय पुढे म्हणाले नेपाळच्या संसदेतील दोन तृतीयांश प्रतिनिधी साम्यवादी आहेत. या साम्यवादी संसदेच्या प्रभावाखाली हिंदु असुरक्षित आहेत. त्यामुळे नेपाळला हिंदु राष्ट्र बनवण्याचे आंदोलन आम्ही चालूच ठेवणार असून येत्या दोन वर्षांच्या आतच नेपाळला पुनश्च हिंदु राष्ट्र बनवू. हे हिंदु राष्ट्र केवळ शाब्दिकदृष्ट्या नको, तर हिंदु राष्ट्रामध्ये शासनप्रणालीच सनातन धर्मानुसार चालणारे शासन अपेक्षित आहे.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी काठमांडू (नेपाळ) येथील सनातन हिंदु मोर्च्याचे अध्यक्ष डॉ. माधव भट्टराय यांचा पुष्पहार अर्पण करून आणि भेटवस्तू देऊन सत्कार केला.