- महंमद पैगंबर यांच्याविषयी व्हॉटस् अॅपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप
- धर्मांधांनी हिंदु देवतांच्या प्रतिमा फेकून पायदळी तुडवल्या !
- अनेकांना मारहाण, एका हिंदूचा डोळा निकामी !
- दगडफेक करून व्यापार्यांच्या दुकानांची नासधूस !
- अल्पसंख्यांकांकडून बहुसंख्यांकांना मार खावा लागणारा जगातील एकमेव देश भारत ! ही स्थिती हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) अपरिहार्यता स्पष्ट करते !
- हिंदूंनो, स्वसंरक्षण प्रशिक्षण घेऊन स्वत:सह आपल्या धर्मबांधवांचेही रक्षण करा !
जळगाव : महंमद पैगंबर यांच्याविषयी व्हॉटस् अॅपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप करत २४ जून या दिवशी धर्मांधांनी येथील गोलाणी मार्केटवर ‘अल्ला हो अकबर’च्या घोषणा देत दगडफेक करून दुकानांची मोठ्या प्रमाणात नासधूस केली, तर अनेक व्यापार्यांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. त्यांनी तोंडावर रूमाल बांधले होते. जमावाने केलेल्या मारहाणीत धरणगाव येथील उज्ज्वल शुक्ल यांचा डोळा निकामी झाला. त्यानंतर संतप्त व्यापार्यांनी शहर पोलीस ठाणे गाठून संबंधितांवर कारवाईची मागणी केली. सुमारे तासभर हा गोंधळ चालू होता.
१. व्हॉटस् अॅपवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या निषेधार्थ अल्पसंख्याक विकास परिषदेच्या वतीने डॉ. मुबिन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली २४ जून या दिवशी दुपारी जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
२. हे निवेदन देण्यासाठी ३०० ते ४०० धर्मांधांचा जमाव जिल्हाधिकारी कार्यालयात गेला होता. तेथेही या जमावाने गोंधळ घातला, तसेच शिवीगाळ केली. या वेळी अनेकांनी त्यांचे चेहरे झाकले होते. निवेदन दिल्यानंतर तेथून ४० ते ५० जणांचा जमाव गोलाणी मार्केटकडे आला. या वेळी धर्मांध तरुणांनी बाजारपेठेच्या तिन्ही बाजूंना पसरून एकाच वेळी आत प्रवेश केला.
३. बाजारपेठेत प्रवेश करताच त्यांनी दिसेल त्या वस्तूंची तोडफोड करण्यास सुरुवात केली. मार्केट बंद करो असे म्हणत त्यांनी शिवीगाळही केली. त्यातील काही जणांनी हातात लाठ्या-काठ्या, दगड घेऊन दहशत पसरवली.
४. जमावातील काही धर्मांधांनी चहाच्या दुकानातील काचेचे पेले हातात घेऊन ते इतर दुकानांवर फेकले. यात काही लोकांना काच लागून ते घायाळ झाले. दुकानातील पटल (टेबल) आणि आसंद्या (खुर्च्या) यांची तोडफोड करण्यात आली. धर्मांधांनी काही भित्तीपत्रक आणि देवतांच्या चित्रांच्या प्रतिमा ओढून त्या पायदळी तुडवल्या. या दगडफेकीत साई सागर मोबाईल आणि गजानन मेटल या दुकानांची सर्वाधिक हानी झाली.
५. गोलाणी मार्केटमध्ये दगडफेक करणार्या दोघा धर्मांधांना तेथील व्यापार्यांनी पकडून चोप देऊन पोलिसांच्या कह्यात दिले. त्यांच्याकडून माहिती घेऊन पोलिसांनी महंमद बिलाल फारुख, वसीम खान अब्दुल खान, इमरान अब्दुल खान, मोहसिन साबीर बागवान, सय्यद कलीम जुबेर अली, दानेश नासिर आणि अमीर अली महंमद अली सय्यद यांना कह्यात घेतले आहे, तर २६ जणांवर गुन्हा प्रविष्ट केला.
६. दोन दिवसांपूर्वी व्हॉट्स अॅपवरील पोस्टमुळे अजिंठा चौफुलीवर रास्ता रोको करून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती, तसेच काही गाड्यांच्या काचाही फोडल्या होत्या. त्यानंतर २४ जूनला ही घटना घडली.
७. घटनेच्या अर्ध्या घंट्यांनी पोलीस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी गोलाणी मार्केटला भेट दिली. त्यांच्या समक्ष संतप्त व्यापार्यांनी घोषणा दिल्या. गोलाणीत दहशत माजवणार्या संशयितांच्या अटकेसाठी ४ पथके सिद्ध करण्यात आली आहेत.
८. जमावातील ३-४ जण एका दुचाकीवर बसून आले होते. काही जण एका मारुती ओमनी या वाहनातून लाकडाचे दांडे अन् दगडही घेऊन आले होते. त्यांनी आणलेली वाहने गोलाणी मार्केटच्या बाहेरच उभी होती. पोलिसांनी ही वाहनेही कह्यात घेतली आहेत. (यावरून ही दंगल पूर्वनियोजितच होती, हे स्पष्ट होते. ठरवून दंगली घडवणार्या या धर्मांधांवर पोलिसांकडून कठोर कारवाई होणे अपेक्षित ! – संपादक)
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात