कराड : न्यायालयात न्याय मिळण्याचे दिवस संपले. आता तेथे पोटगी मिळते, घर मिळत नाही. वडील गेल्यानंतर ८ व्या दिवशी बहीण भावाला न्यायलयात खेचते. सरकारने केवळ हिंदूंनाच लोकसंख्या अल्प करण्याचे सांगितल्याने सर्व नातीच संपून गेली आहेत, असे प्रतिपादन अधिवक्त्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांनी केले. येथे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिंदु स्त्रियांसमोरील सांस्कृतिक आव्हान या विषयावर त्या बोलत होत्या. या वेळी पुष्कळ महिला उपस्थित होत्या.
त्या पुढे म्हणाल्या…
१. मुलींनो, मी दिसते कशी, याची काळजी न करता मी आहे कशी, याची काळजी करा.
२. आपल्या घरात असलेल्या प्रत्येक नात्याला न्याय द्यायला शिका.
३. पुढील १० वर्षेच घराचे घरपण टिकणार आहे. आई आणि शिक्षक बिघडले, तर संपूर्ण संस्कारांचा नाश झाला, असे समजा.
४. आईच्या हृदयातील प्रेम आणि संस्कार यांच्या अस्तित्वाला पुष्कळ महत्त्व असते.
५. महिलांना देवाने नाजूक शरीर दिलेले असले, तरी मन मात्र खंबीर आहे. आईने आपल्या मुलीला मुलासारखे न वागवता तिला पुरुषार्थ करायला शिकवणे आवश्यक आहे.
६. पालकांनी आपल्या मुलांना कॉन्व्हेंट शाळेत घालू नये. तेथे ख्रिस्ती धर्मांतराचे मोठे षड्यंत्र चालू आहे.
७. मुलगी महाविद्यालयातून घरी येईपर्यंत आपल्याला काळजी वाटते. त्यासाठी आईने मुलीला वयाच्या दुसर्या वर्षापासून धर्म समजावून सांगावा.
८. लग्नात मुलींना नटवण्यासाठीचे सर्व कंत्राट मुसलमान मुलांकडे असते; मात्र सर्वांनी त्यावर बहिष्कार घालायला हवा. मुलींचे कपडे मुसलमानांकडे शिवण्यास देऊ नये. शाळेत मुलांना सोडणारा रिक्शावाला, घरात काम करणारी मोलकरीण हीसुद्धा मुसलमान नको.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात