Menu Close

रमझानमुळे मंदिरातील पूजा आणि हनुमान चालिसा पठण बंद पाडण्याच्या धर्मांधांच्या कृतीस विश्‍व हिंदु सेनेकडून चोख उत्तर !

१० सहस्र हिंदूंना संघटित करून पूजा आणि हनुमान चालिसाचे पठण !

हिंदूंच्या लहान लहान संघटना धर्मांधांच्या आघातांना विरोध करतात, अशा वेळी मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना कुठे असतात ? दिवसांतून ५ वेळा देशभरात वैध आणि अवैध मशिदींतून होणार्‍या अजानचा हिंदू कधी विरोध करतात का ?

hindu_unity1

नवी देहली : देहलीच्या सुंदरनगरी येथील महाशिवशक्ती मंदिरात चालू असलेले हनुमान चालिसाचे पठण मुसलमानांच्या दबावामुळे २३ जूनपासून बंद करण्यात आले होते. रमझानचा महिना चालू असेपर्यंत पूजा आणि पठण बंद करण्याची पूजार्‍याला धमकी देऊन तेे बंद केले होते. पूजा किंवा पठण चालू ठेवल्यास त्याचे परिणाम वाईट होतील, अशी धमकी देण्यात आली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर २५ जूनला विश्‍व हिंदु सेनेने १० सहस्र हिंदूंना संघटित करून मंदिराच्या बाहेर रस्त्यावर हनुमान चालिसाचे पठण केले. तसेच पूजा आणि हनुमान चालिसाच्या पठणानंतर ध्वनीक्षेपकावरून धर्माधांना चेतावणी देण्यात आली की, पुन्हा अशा प्रकारची धमकी देऊन पूजा आणि पठण बंद केल्यास त्याचा मोठ्या प्रमाणात विरोध केला जाईल. या वेळी देहली प्रशासन आणि पोलीस यांनी हिंदूंना साहाय्य केले. विश्‍व हिंदु सेनेचे श्री. विनोद शर्मा यांनी त्यांचे आभार मानले. (देहलीतील या पोलिसांचे आणि प्रशासनाचे अनुकरण देशातील पोलीस आणि प्रशासन यांनी करावे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *