Menu Close

केंद्रीय अन्वेषण विभागाकडून होणारा सनातन संस्थेचा छळ थांबवण्यासाठी ठोस भूमिका घ्या !

हिंदुत्ववादी संघटनांची कराड येथील निवासी नायब तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

karad_nivedan

कराड : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने कोणत्याही दबावाला बळी न पडता निष्पक्षपातीपणे चौकशी करावी, तसेच राष्ट्रप्रेमी सनातन संस्थेचा छळ थांबवण्याविषयी ठोस भूमिका घ्यावी, याविषयीचे निवेदन येथील समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने निवासी नायब तहसीलदार श्री. अजित कुर्‍हाडे यांना देण्यात आले. या निवेदनातून केंद्रीय गृहमंत्री श्री. राजनाथ सिंह यांना कळवण्यात आले आहे की, दाभोलकर हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना संशयित म्हणून अटक केली आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नसतांना प्रसारमाध्यमांतून खोट्या बातम्या दिल्या जात आहेत. कोणत्याही अन्वेषण यंत्रणेने सनातनला अजून दोषी ठरवलेले नसतांना काही राजकीय पक्ष, पुरोगामी संघटना, तथाकथित नास्तिकवादी संघटना यांच्याकडून सनातन संस्थेवर बंदी घालण्याची अन्याय्य मागणी केली जात आहे. त्यामुळे हे थांबवावे.

निवेदनात हिंदुत्ववादी संघटनांनी म्हटले आहे…

१. सनातन संस्थेवर लक्ष केंद्रित करणार्‍या काही संघटनांवर आर्थिक घोटाळ्यांचे आरोप असल्यामुळे तपासयंत्रणा सत्यापर्यंत पोहोचू नयेत, या धडपडीतून सनातनला लक्ष्य केले जात आहे का ? याच्याही चौकशीचे आदेश द्यावेत.

२. चौकशीच्या नावाखाली सध्या सनातन संस्थेच्या कोणत्याही साधकाचे नाव वृत्तपत्रांतून अथवा वृत्तवाहिन्यांद्वारे सातत्याने दाखवून त्यांची अपकीर्ती करण्यात येत आहे. एखाद्यावरील आरोपांची कोणत्याही प्रकारची निश्‍चिती झालेली नसतांना अशी नावे येणे, हा चरित्र्यहननाचा प्रकार आहे. असे प्रकार त्वरित थांबवण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना द्यावेत.

३. सनातनविषयी कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी सनातनचे म्हणणे मांडण्यासाठी आपल्या भेटीची वेळ मिळावी.

निवेदन देतांना हिंदु एकताचे श्री. अजय पावसकर, हिंदु एकताचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. रूपेश मुळे, ह.भ.प. (कीर्तनकार) अंकुश लोहार, धर्म जागरण कराडचे तालुका प्रमुख श्री. गणेश महामुनी, श्री शिवप्रतिष्ठानचे सर्वश्री अमोल कुंभार, अजय खबाळे, विशाल ढवळे, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष श्री. गणेश कापसे, अजय खबाळे, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातनचे साधकही उपस्थित होते.

 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *