Menu Close

कार्वे (जिल्हा सातारा) येथे पोलीस आणि प्रशासन यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला जागेची अनुमती

shivaji_maharajकार्वे : येथील हिंदुत्ववादी संघटनांच्या दबावानंतर पोलीस आणि प्रशासन यांनी शासकीय भूमीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेची अनुमती दिली.

१. कार्वे, तालुका कराड येथील कार्वे-शेणोली राज्यमार्गाचे रुंदीकरणाचे कार्य चालू आहे. कार्वे गावानजीक असलेल्या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शासकीय हद्दीमध्ये आहे.

२. तो पुतळा शासकीय भूमीवरील अतिक्रमण असून रस्ता रुंदीकरणामध्ये अडथळा निर्माण करत आहे, असे सांगून पाटबंधारे खाते तो मागे हलवण्याच्या विचारात आहे. २८ जून या दिवशी सरकारकडून पुतळा हलवण्यात येणार असल्याची नोटीस ग्रामपंचायतीला देण्यात आली. नोटिसीची एक प्रत कराड ग्रामीण पोलीस ठाण्याला माहितीसाठी देऊन त्यांच्याकडून आवश्यक ते पोलीस संरक्षण मागण्यात आले आहे. (अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांच्या संदर्भात असा प्रसंग घडवला असता, तर त्यांना विरोध करण्याचे अथवा ते हटवण्याचे धाडस झाले असते का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

३. हिंदुत्ववादी संघटनांनी याविषयी कराड तालुका ग्रामीण पोलीस निरीक्षक श्री. अण्णासाहेब मेठारी आणि पाटबंधारे अधिकारी पंढारे यांच्याशी बैठक घेतली; पण प्रारंभी दोन्ही अधिकार्‍यांनी नकारात्मक पवित्रा घेतला. शेवटी हिंदुत्ववाद्यांच्या दबावापुढे नमते घेऊन कार्वे गावाच्या त्याच चौकात ९ फूट परिघाचा वापर शिवछत्रपती यांच्या पुतळ्यासाठी करण्यास अनुमती देण्यात आली आणि रस्त्यावरील अतिक्रमण हटल्यास पुतळ्याची जागा वाढवली जाईल, असे त्यांनी सांगितले. (हिंदूंनो, असा संघटितपणा नेहमीच दाखवल्यास राष्ट्र आणि धर्म कार्यातील अडथळे निश्‍चितच दूर होतील ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या वेळी कार्वे ग्रामपंचायतचे सदस्य सर्वश्री जनार्दन देसाई, रोहित जाधव, शिवाजी थोरात, दीपक जाधव, उपसरपंच वैभव थोरात, माजी सरपंच अधिका गुजळे, भाजप कराड जिल्हाध्यक्ष विक्रमदादा पावसकर, हिंदु एकता आंदोलनचे कराड तालुका उपाध्यक्ष श्री. रूपेश मुळे, श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. सागर आमले, शिवसेनेचे श्री. शसिकांत हापसे आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्तेही उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *