Menu Close

जोधपूर, राजस्थान येथे जोधपूर सेवा सन्मान समारोहात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचा सन्मान

नंदकिशोर राठी मेडिकल अ‍ॅण्ड एज्युकेशनल चॅरिटेबल ट्रस्ट आणि सिटीझन सोसायटी फॉर एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन

hjs_ss_satkar
डावीकडून श्री. आनंद राठी आणि श्री. सुरेश राठी यांच्याकडून सन्मान स्वीकारतांना सौ. सुशिला मोदी, त्यांच्या बाजूला सौ. राखी मोदी

जोधपूर (राजस्थान) : जोधपूरमध्ये कार्यरत स्वयंसेवी संस्थांचा समाजाला परिचय व्हावा, याकरता नंदकिशोर राठी मेडिकल अ‍ॅण्ड एज्युकेशनल चॅरिटेबल ट्रस्ट आणि सिटीझन सोसायटी फॉर एज्युकेशन यांच्या संयुक्त वतीने नुकतेच जोधपूर सेवा सन्मान समारोहाचे आयोजन करण्यात आले. या समारोहामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती या संघटनांसह स्थानिक १५१ स्वयंसेवी संस्थांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी व्यासपिठावर प.पू. स्वामी देवगिरीजी महाराज, पू. स्वामी अचलानंदजी यांच्या वंदनीय उपस्थितीसह महापौर श्री. घनश्याम ओझा, विभागीय आयुक्त श्री. रतन लाहोटी, जोधपूर स्वयंसेवी संस्था संघाचे अध्यक्ष श्री. गोपालचंद भंडारी उपस्थित होते. या वेळी ट्रस्टचे विश्‍वस्त श्री. आनंद राठी आणि श्री. सुरेश राठी यांच्या हस्ते सहभागी संस्थांना स्मृतीचिन्ह आणि आर्थिक साहाय्य देण्यात आले. हा सन्मान सनातन संस्थेच्या वतीने साधिका सौ. सुशिला मोदी आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने साधिका सौ. राखी मोदी यांनी स्वीकारला.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *