हिंदूंसाठी श्रद्धास्थानी असणार्या गोमातांची हत्या करून त्यांच्या मासांची वाहतूक करणार्यांच्या विरोधात हिंदूंचा हा उद्रेक राज्यकर्ते केव्हा लक्षात घेणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मानेसर (हरियाणा) : येथे गोरक्षकांनी गोमांसाची वाहतूक करणार्या रिझवान आणि मुख्तयार यांना चोपले आणि त्यांना शेण खायला लावल्याची घटना घडली. हरियाणा सरकाराने गोमांस विक्रीस बंदी घातली आहे.
गोरक्षक दलाचे गुडगाव येथील प्रमुख धमेंद्र यादव यांनी सांगितले की, कुंडली-मानेसर-पलवल द्रुतगती मार्गावर टेम्पोमधून गोमांस नेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांनी रिझवान आणि मुख्तयार या दोघांना टेम्पोचा ७ किलोमीटर पाठलाग करून बदरपूर सीमेजवळ रोखले. त्यांच्याजवळ ७०० किलो गोमांस सापडले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात