Menu Close

बांगलादेशमध्ये हिंदु वैद्याचा जिहाद्यांकडून शिरच्छेद !

इस्लाम म्हणजे शांती, असे म्हणणारे आता तोंड उघडतील का ? भगव्या आतंकवादाचा डांगोरा पिटणारे हिरव्या आतंकवादावर बोलतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

आयुर्वेदिक उपचारपद्धत इस्लामविरोधी असल्याचा आरोप करत हत्या !

dharmandh1ढाका : बांगलादेशमधील रौझान चितगाव येथे हिंदु वैद्य आणि आयुर्वेदिक वनस्पतींचा पुरवठा करणारे सुलाल चौधरी यांची जिहादी आतंकवाद्यांनी शीर धडावेगळे करून २५ जून या दिवशी निर्घृण हत्या केली. आयुर्वेदिक उपचारपद्धत इस्लामविरोधी असल्याच्या कारणावरून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय असून बांगलादेशमधील इबेला ही वृत्तवाहिनी वगळता कुठल्याही प्रसारमाध्यमाने हे वृत्त दिले नाही. (बांगलादेशातील वृत्तवाहिन्यांचा हिंदुद्वेष ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

सुलाल (कविराज) चौधरी चितगाव येथील चीकाडेर येथील रहिवासी होते. ते २५ जूनच्या रात्री त्यांच्या फातीकचारी आझादी बाजार येथील चिकित्सालयातून रिक्शाने घरी परतत होते. त्यांची रिक्शा एका पुलावरील निर्जन स्थळी आली असता जिहादी आतंकवाद्यांनी ती अडवली आणि चौधरी यांच्या मानेवर तीक्ष्ण हत्यारांनी आक्रमण करून त्यांचे शिर धडावेगळे केले. चौधरी यांच्या पत्नी चंपा चौधरी यांनी पतीला घरी परतण्यास विलंब झाला म्हणून भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याला उत्तर मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी रौझान पोलीस ठाण्याशी संपर्क केला, तेव्हा त्यांना पतीची हत्या झाल्याचे कळले.

हिंदूंनो, बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी भारत सरकार स्वतःही काही करत नाही आणि जे हिंदूंच्या रक्षणासाठी कार्य करत आहेत, त्यांनाही आडकाठी आणते, हे लक्षात घ्या !

बांगलादेशात हिंदूंच्या रक्षणासाठी कार्यरत असणारे बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता रवींद्र घोष यांना गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात सहभागी होण्यासाठी भारत सरकारने व्हिसा नाकारला. त्यामुळे ते या अधिवेशनात सहभागी होऊ शकले नाही.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *