Menu Close

काबुलमध्ये लष्कराच्या बसवर आत्मघातकी हल्ला, ४० जवान ठार

kabul_attack

काबुल : अफगानिस्तानची राजधानी काबुल दोन आत्मघातकी हल्ल्याने हादरले आहे. अतिरेक्यांनी लष्कराच्या ताफ्याला टार्गेट केले आहे. त्यात ४० जवान ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

१. काला-ए-हैदर खान परिसरात तालिबान्यांनी लष्कराच्या बसला टार्गेट केले.

२. दोन आत्मघातकी हल्लेखोरांनी ताफ्यातील बसजवळ स्वत:ला उघडवून घेतले. हल्ल्यात ४० जवान ठार झाले अाहे. अनेक जण जखमी झाले आहेत.

३. मृतांमध्ये लष्कराचे प्रशिक्षण घेतलेल्या जवानांचा समावेश असल्याचे पघमनचे गर्व्हनर हाजी मोहम्मद मूसा खान यांनी माहिती दिली आहे.

४. दरम्यान, मागील आठवड्यात तालिबान्यांनी एका प्रवाशी बसवर हल्ला केला होता. त्यात १४ जण ठार झाले होते.

संदर्भ : दिव्य मराठी

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *