मंदिरात जातांना महिलांनी करावयाचा पोशाख या विषयावर कर्नाटकात वृत्तवाहिन्यांवर चर्चासत्र !
बेंगळुरू : २४ जुलै या दिवशी बेंगळुरू येथील पब्लिक टी.व्ही या वृत्तवाहिनीवर मंदिरात जातांना महिलांनी करावयाच्या पोशाखासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या बेंगळुरू येथील समन्वयक कु. भव्या गौडा; धारवाड येथील समन्वयक सौ. विदुला हळदीपूर; मैसूर, हासन आणि तुमकूर येथील समन्वयक सौ. सुमा मंजेश, आंतरराष्ट्रीय महिला संघाच्या संस्थापक अध्यक्ष सौ. सुमित्रा अय्यंगार आणि वेदमाता संस्थेच्या संचालिका सौ. सुकन्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या.
या वेळी रणरागिणी शाखेच्या कार्यकर्त्यांनी मंदिरात प्रवेश करतांना भारतीय पोशाख परिधान करण्याचे महत्त्व, तसेच त्यामागील आध्यात्मिक दृष्टीकोन आणि मंदिरात प्रवेश करतांना भारतीय पोशाख परिधान करून ईश्वरी कृपा कशी ग्रहण करावी, याविषयी माहिती दिली. रणरागिणी शाखेच्या कार्यकर्त्या मंदिर प्रवेश करतांना महिलांनी भारतीय पोशाख परिधान करावा, यासाठी निवेदन देत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना या चर्चासत्रासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
टीव्ही ९ वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रातूनही प्रबोधन !
याच विषयावर टीव्ही ९ या वृत्तवाहिनीवरही चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी रणरागिणी शाखेच्या समन्वयक कु. भव्या गौडा यांनी वरील सूत्रे मांडली. या चर्चासत्रात सहभागी श्री. सोमयाजी गुरुजी आणि सौ. अनुपमा रेड्डी यांनी भारतीय पोशाख परिधान करण्याच्या समर्थनार्थ सूत्रे मांडली, तर कु. पल्लवी आयदूर यांनी विरोधात सूत्रे मांडली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात