Menu Close

इफ्तार पार्टी आयोजित करणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हिंदू महासभेची टीका !

इफ्तार पार्टी देणारा संघ कधी नवरात्री किंवा हिंदूंचे अन्य उत्सव का साजरा करत नाही ?

hindu_mahasabha

नवी देहली : येथे २ जुलैला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असणार्‍या मुस्लिम राष्ट्रीय मंचकडून इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. यावर हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून टीका केली जात असतांना आता अखिल भारत हिंदू महासभेनेही टीका केली आहे. महासभाने संघावर मुसलमानांचे लांगूलचालन करण्याचा आरोप करत पार्टी रहित करून क्षमा मागण्याची मागणी केली आहे. संघाने यापूर्वीच मुस्लिम राष्ट्रीय मंचाचा संघाशी संबंध नसल्याचे म्हटले आहे; मात्र यावर कोणीही विश्‍वास ठेवण्यास सिद्ध नाही.

हिंदू महासभेचे सरचिटणीस मुन्ना कुमार शर्मा आणि कार्यालय सचिव वीरेश त्यागी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, केशव हेडगेवार यांनी हिंदूंच्या हितांच्या रक्षणासाठी संघाची स्थापना केली; मात्र आता ही संघटना मुसलमानांच्या हितांचे रक्षण करत आहे. संघ त्याच्या मूळ ध्येयधोरणांपासून भटकला आहे. इफ्तार पार्टीचे आयोजन करणारा संघ कधी नवरात्र व्रत आणि अन्य हिंदु उत्सव आयोजित करत नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *