Menu Close

पठाणकोटवर संभावित पॅरा मोटर्स, ग्लायडर्स आणि ड्रोन विमाने यांद्वारे आतंकवादी आक्रमणाची शक्यता !

प्रत्येक वेळी आतंकवादाच्या भक्ष्यस्थानी पडण्यापेक्षा एकदाच शत्रूला धडा का शिकवत नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभातpathankot

पठाणकोट : शहरावर काही आतंकवाद्यांकडून आक्रमण होण्याची शक्यता लक्षात घेऊन भारतीय वायूदलाच्या अधिकार्‍यांनी एअरबेसच्या परिसरातील भागामध्ये घरोघरी जाऊन जागृती अभियान राबवून संभावित आतंकवादी आक्रमणाविषयी लोकांना जागृत केले. या वेळी अधिकार्‍यांनी आकाशात उडणारे पॅरा मोटर्स, ग्लायडर्स आणि ड्रोन विमाने यांची छायाचित्रे दाखवून लोकांना दक्ष रहाण्यास सांगितले. सूत्रांनुसार पॅराग्लायडर्स रडारद्वारेही पकडू शकत नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह वस्तू आकाशात दिसल्यास त्वरित त्याविषयी सूचना देण्यास सांगण्यात आले. पठाणकोट एअरबसवर आक्रमण होण्याची गुप्तचर विभागाला माहिती मिळाल्यावर ही खबरदारी घेण्यात आली.

सत्तापालट होऊनही देशात आतंकवादी आक्रमणे चालूच !

पुन्हा आक्रमण करण्याचे धाडस होणार नाही, असा धडा शासन आतंकवाद्यांना कधी शिकवणार ?  मोदी पंतप्रधान झाल्यावर आतंकवादी आक्रमणे थांबतील अशी आशा होती ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

नवी देहली : काही दशकांपासून भारतावर आतंकवादी आक्रमणे होत आहेत. केंद्रात सत्तापालट होऊनही देशात आतंकवादी आक्रमणे चालूच आहेत. त्यामुळे कोणाचेही शासन असो आतंकवादी आक्रमणात भारतीय सैनिक मरतच रहाणार, अशी जनतेची मानसिकता झाली आहे. नुकतेच पंपोर येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सैनिकांना घेऊन जाणार्‍या वाहनावर आतंकवादी आक्रमण झाले. या आक्रमणात ८ सैनिकांना प्राण गमवावे लागले, तर २१ जण घायाळ झाले. (अमेरिकेत अल् कायदाने आतंकवादी आक्रमण केल्यावर पुन्हा इस्लामी देशातील आतंकवाद्यांकडून आक्रमण करण्याचे धाडस आतंकवादी संघटनांकडून झाले नाही; मात्र भारत एक सामर्थ्यवान देश असतांनाही पुन:पुन्हा आतंकवादी आक्रमणात जनता प्राण गमावत आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

१. सूत्रांनुसार मागील एक वर्षाच्या काळात पाककडून करण्यात आलेले शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि आतंकवादी आक्रमण यांत १९० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. यात ४७ सुरक्षासैनिक आणि १०८ आतंकवादी यांचा सहभाग आहे.

२. ५ जानेवारी २०१५ ते १५ जानेवारी २०१६ या काळात आतंकवाद्यांच्या संदर्भात १४६ घटना घडल्या. ज्यात ३९ सुरक्षा सैनिक आणि २२ नागरिक ठार झाले.

३. याच काळात सीमेवर गोळीबाराच्या १८१ घटना घडल्या. या घटनांमध्ये २२ लोकांचा मृत्यू झाला. यात ८ सुरक्षा सैनिक ठार झाले.

४. गृहमंत्रालयाच्या आकड्यांनुसार वर्ष २०१४, २०१५ आणि फेब्रुवारी २०१६ पर्यंत देशात अनुक्रमे २२२, २०८ आणि २१ आतंकवादी आक्रमणे झाली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *