Menu Close

एका मासातील ६ वी घटना : बांगलादेशमध्ये आणखी एका पुजार्‍यावर प्राणघातक आक्रमण !

भाजप सरकारकडून हिंदूंच्या रक्षणाची अपेक्षा नाही. मोठ्या हिंदुत्ववादी संघटनांकडूनही अपेक्षा नाही; कारण त्या भारतातच हत्या होणार्‍या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या संदर्भात त्या काही करत नाहीत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान नंतर आता बांगलादेशात हिंदूंचा वंशविच्छेद !

dharmandh1ढाका : बांगलादेशामध्ये हिंदु पुजार्‍यांची हत्या करण्याचे सत्र चालूच असून ४८ वर्षीय बाबासिंधू रॉय या आणखी एका पुजार्‍यावर चाकूने आक्रमण करण्यात आले. या आक्रमणात ते गंभीर घायाळ झाले असूत त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. बांगलादेशच्या सतखिरा जिल्ह्यात असलेल्या श्री श्री राधागोविंद मंदिरात ते पुजारी होते. गेल्या २४ घंट्यांमध्ये हिंदु पुजार्‍यावरील आक्रमणाची ही दुसरी घटना असून गेल्या मासाभरातील हिंदु नागरिकाच्या हत्येची ही ६ वी घटना आहे. या सततच्या आक्रमणामुळे तेथील हिंदू भयभीत झाले आहेत.

ढाक्यातील स्पॅनिश हॉटेलात झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर काही घंट्यातच ७-८ आक्रमणकर्ते राधागोविंद मंदिराच्या आवारात घुसले. त्यांनी रॉय यांच्या घराचा दरवाजा ठोठवला. सुरक्षा रक्षक असावा, असे समजून रॉय यांनी दार उघडल्यावर काही कळण्याच्या आत त्यांनी रॉय यांच्या छातीवर आणि पाठीवर धारदार शस्त्रांनी वार केले.

या आक्रमणात गंभीर घायाळ झालेले रॉय यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. १ जुलै या दिवशी जैनैदाह जिल्ह्यातील एका मंदिरातच श्यामनोंद दास नावाच्या ४५ वर्षीय पुजार्‍याची गळा चिरून हत्या करण्यात आली होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *