Menu Close

चिंचली येथील मद्याची दुकाने बंद करा, अन्यथा मायाक्का देवीचे मंदिर उडवून देऊ ! – निनावी पत्राद्वारे देवस्थानला धमकी

हिंदूंची असुरक्षित मंदिरे !

mayakka_temple_belgaon
मायाक्का देवीचे मंदिर

रायबाग (जिल्हा बेळगाव) : चिंचली गावातील मद्याची दुकाने बंद न केल्यास मायाक्का देवस्थान उडवून देण्याच्या धमकीचे पत्र चिंचली येथील सुक्षेत्र मायाक्का देवीच्या देवस्थानातील दानपेटीत मिळाले आहे. यामुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे धमकी पत्र निनावी आहे. पत्याच्या ठिकाणी चिठ्ठीमध्ये कलियुगातील युवक, गाव चिंचली आणि विषयाच्या जागी देव नसलेले मंदिर कोणास हवे, असे लिहिले आहे, तर पुढील माहितीत तुमचा देवावर विश्‍वास आणि भक्ती असेल, तर देवस्थान वाचवावे. मी या देवस्थानावर डिसेंबर १ तारखेला आक्रमण करून सर्वनाश करण्याचा विचार केला आहे. माझ्याजवळ देवस्थान उडवण्याचे सर्व साहित्य आहे. जर चिंचली गावातील मद्याची सर्व दुकाने बंद केली, तर मी मंदिरास काहीही धोका पोचोवणार नाही, असे म्हटले आहे. अशा आशयाचे निनावी पत्र देवस्थानाच्या दानपेटीत टाकले आहे. यामुळे गावात खळबळ माजली आहे. याविषयी कुडची पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर मुकरी यांच्याशी संपर्क साधून माहिती देण्यात आली. या प्रकरणाची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *