जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) : विद्यमान शासनाने गोहत्या बंदी कायदा लागू केला आहे. तरीही छुप्या पद्धतीने गोहत्या होत आहेत. शहर आणि शहराच्या आजूबाजूच्या गावांमध्ये गोहत्या करून गोमांस वाहतूक करतांना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करावी.
६ जुलै या दिवशी रमजान ईद हा मुसलमान समाजाचा सण साजरा होत आहे. तरी या दिवशी आणि दोन दिवस अगोदर काही समाजकंटक गोहत्या करतात. त्यामुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकते. तरी रमजान ईदच्या निमित्ताने गोहत्या होऊ नये, यांसाठी दक्षता घ्यावी, अशा मागणीचे निवेदन बजरंग दलाचे जयसिंगपूर शहर संयोजक श्री. विजय धंगेकर यांच्या नेतृत्वाखाली जयसिंगपूर शहर पोलीस ठाण्यात साहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दत्तात्रय कदम यांना देण्यात आले. या वेळी सर्वश्री प्रदीप वरेकर, संभाजी शिंदे, मरयाप्पा लांडगे, अमर जुवे, विकी धंगेकर, सचिन मोहिते उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात