Menu Close

माझ्यावर आक्रमण करून दाखवा ! – टी. राजासिंह ठाकूर यांचे इसिसच्या आतंकवाद्यांना आव्हान

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जिहादी आतंकवाद्यांच्या धमक्या येत, तेव्हा त्यांनी म्हटले होते की, मला
मारणारी गोळी ज्या रंगाची असेल, त्या रंगाची जमात शिल्लक रहाणार नाही !

t_rajasingh

भाग्यनगर : येथील भाजपचे आमदार आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ टी. राजासिंह यांनी इसिसच्या आतंकवाद्यांना आव्हान दिले आहे. टी. राजासिंह यांनी म्हटले आहे, माझ्यावर आक्रमण करून दाखवा. तसेच आतंकवाद्यांची पाठराखण करणारे एम्आयएम् चे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी या आतंकवाद्यांना वाचवून दाखवावे, असे आव्हानही दिले आहे. नुकत्याच येथून पकडण्यात आलेल्या इसिसच्या आतंकवाद्यांच्या चौकशीतून त्यांनी टी. राजासिंह यांना ठार करण्याचा कट रचला होता, असे उघड झाले आहे. टी. राजासिंह यांनी जिहादी आतंकवाद्यांच्या अटकेवर मौन बाळगणार्‍या तेलंगण आणि आंध्रप्रदेश या राज्यांच्या सरकारांवरही टीका केली. ओवैसीसारखे लोक उघडपणे जिहादी आतंकवाद्यांची पाठराखण करत असतांना सरकार गप्प का आहेे ?, असा प्रश्‍न त्यांनी विचारला आहे.

टी. राजासिंह यांनी मागणी केली आहे की, सध्या देशात हिंदूंच्या मंदिरांवरील आक्रमणाच्या अनेक घटना घडत आहेत आणि इस्लामी आतंकवादात वाढ झालेली आहे, अशा वेळी सरकारने त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे.


आमदार टी. राजसिंह यांची हत्या करणार होते इसिसचे आतंकवादी !

हिंदूंनो, जिहादी आतंकवादी तुमच्या नेत्यांना वेचून वेचून ठार करण्यापूर्वी हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) स्थापना करा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

भाग्यनगर : तीन दिवसांपूर्वी भाग्यनगर येथून अटक करण्यात आलेले इसिसचे ५ आतंकवादी शहरातील गोशामहल येथील भाजपचे आमदार आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ टी. राजासिंह यांची हत्या करणार होते, असे चौकशीतून समोर आले आहे. यापूर्वी शहरात दंगल घडवण्यासाठी येथील भाग्यलक्ष्मी मंदिरात गोमांस फेकण्याची माहिती समोर आली होती.

टी. राजासिंह यांच्या हत्येसाठी गेल्या मे महिन्यांत त्यांच्या घराचे तीन वेळ अवलोकन करण्यात आले होते. राजासिंह प्रतिवर्षी येथे रामनवमीच्या वेळी लक्षावधी हिंदूंची मिरवणूक काढतात, तसेच गोरक्षण करतात म्हणून त्यांची हत्या करण्यात येणार होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *