अहिंसक बौद्धांनाही धर्मांधांच्या विरोधात कृती करावीशी वाटते, याचा विचार तथाकथित पुरोगामी आणि निधर्मी विचार करतील का ? – सम्पादक, दैनिक सनातन प्रभात
यांगून – बौद्ध धर्मियांच्या एका जमावाने उत्तर म्यानमारमधील काचीन राज्यात असलेल्या हपाकांत गावात एका मशिदीला आग लावून ती भस्मसात केली. पोलिसांनी जमावाला रोखण्याचा असफल प्रयत्न केल्यानंतर आता त्या गावातील बंदोबस्तात वाढ केली आहे. एका आठवड्यातील अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी अवैधरित्या बांधण्यात येणारा मदरसा पाडण्यात आला होता.
हपाकांत गावात एका बुद्ध पागोडाजवळ या वादग्रस्त मशिदीची उभारणी केल्याने बौद्ध धर्मियांत राग होता. तसेच येथे उभारण्यात
येणार्या पुलासाठी ही मशीद अडसर ठरत असल्याने तिला ३० जूनपर्यंत पाडण्यास प्रशासनाने सांगितले होते; मात्र ती सूचना पाळण्यात आल्याने त्याचा भडका उसळून त्याचे पर्यवसान मशीद जाळण्यात झाले. (भारतात आज सहस्रो अवैध मशिदी उभ्या आहेत आणि त्या देशाच्या विकासात अडसर ठरत आहेत; मात्र एकाही राजकीय नेत्यामध्ये त्यावर उपाय शोधण्याचे धाडस नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) म्यानमार देशात बौद्ध आणि रोहिंग्या मुसलमान यांच्यात २०१२ पासून वांशिक दंगली होत आहेत. रोहिंग्या मुसलमानबहुल असलेल्या राज्यात अनेक दंगली उसळून तेथील सहस्रो रोहिंग्या मुसलमानांनी पलायन करून बांगलादेश आणि भारतात आश्रय घेतला आहे.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात