नवी दिल्ली : ‘इसीस‘ या दहशतवादी संघटनेचा प्रसार रोखण्यासाठी अयोध्येमध्ये राममंदिर उभारणे आवश्यक असल्याचे मत विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केले आहे.
विश्व हिंदू परिषदेच्या जबलपूर येथील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत तोगडिया बोलत होते. ते म्हणाले, “भारतामध्ये “इसीस‘ या दहशतवादी संघटनेचा प्रसार रोखण्यासाठी देशाचा विकास आणि अयोध्येमध्ये राममंदिर बांधणे आवश्यक आहे. राममंदिर उभारण्यासाठी संसदेमध्ये कायदा बनविणे हा एकच उपाय आहे. ज्यादिवशी राममंदिरासाठी कायदा तयार होईल, त्यादिवशी मी स्वत: मोदींच्या विजयाचा पताका घेऊन फिरणे सुरु करेल.‘
दरम्यान बुधवारी हिवाळी अधिवेशनासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू यांनी देशवासियांना राममंदिर हवे असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
स्त्रोत : सकाळ