गोरक्षणासाठी हरियाणा शासनाने केलेली कृती देशातील इतर राज्यांनीही अंगीकारावी !
चंदीगड (हरियाणा) : गोहत्याबंदी कायदा करण्यात आल्यानंतर आता हरियाणा पोलिसांकडून गोवंशांच्या रक्षणासाठी हेल्पलाईन चालू करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गाय, वासरू आणि बैल यांची तस्करी किंवा पशूवधगृहाशी संबंधित कोणत्याही घटनेशी संबंधित तक्रार ८२८४०३०४५५ या क्रमांकावर देण्याची सोय करण्यात आली आहे. गोतस्करींच्या तक्रारी समोर आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले.
हरियाणाचे पोलीस महासंचालक के. पी. सिंह यांनी सांगितले की, तक्रार मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी विशेष पथक पाठवून आवश्यक कारवाई करतील, तसेच राज्यात गोतस्करी थांबवण्यासाठी तपासणी नाकेही लावण्यात येईल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात