Menu Close

भाजपचे आमदार संगीत सोम यांना ‘इसिस’कडून धमकी ?

मेरठ : मुझफ्फर दंगलप्रकरणी आरोप असलेले भाजपचे आमदार संगीत सोम यांनी “इसिस‘कडून आपल्याला धमकाविण्यात आल्याचे म्हटले आहे. इसिस या दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीने दूरध्वनीवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सोम यांनी आज सांगतिले.

आपल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर आज सकाळी साडेनऊ वाजता धमकीचा दूरध्वनी आला होता. दक्षिण अमेरिकेतील चिली देशातून हा दूरध्वनी करण्यात आला असून, धमकी देणारी व्यक्ती हिंदीतून बोलत होती, अशी माहितीही सोम यांनी दिली. “इसिस‘चे दहशतवादी भारतात पोचले आहेत. ते लवकरच आपला खून करतील, अशी धमकी या वेळी देण्यात आल्याचे सोम म्हणाले. सोम यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सोम यांना यापूर्वीच “झेड‘ दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे.
स्त्रोत : सकाळ

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *