Menu Close

विद्यार्थिनीची छेड काढणारा धर्मांध पोलिसांच्या कह्यात; जामिनावर सुटका

हिंदूंनो, आपल्या मुलींना धर्मांधांच्या तावडीतून वाचवण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण द्या !

शिरोळ (जिल्हा कोल्हापूर) : येथे इयत्ता सहावीत शिकणार्‍या विद्यार्थिनीला शाळेच्या पटांगणात मारहाण करणारा धर्मांध अमीर दिलावर शेख याला विद्यार्थी आणि शिक्षक यांनी चोप देऊन पोलिसांच्या कह्यात दिले. (शाळेच्या आवरात येऊन विद्यार्थिनीला मारहाण करण्यापर्यंत मुजोर धर्मांधांची मजल जाते, हे जाणा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) मुलीची छेड काढल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

१. येथील एका विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी ४ जुलै या दिवशी दुपारी पटांगणावर खेळत होत्या. या वेळी धर्मांध अमीर शेख तेथील एका मुलीचा हात धरून तू माझ्यासमवेत चल, असे म्हणून तो तिला ओढून घेऊन जाऊ लागला. मुलीने प्रतिकार करताच त्याने तिला मारहाण केली.

२. हा प्रकार इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी पाहिला. मुलांनी अमीरला घेरल्यानंतर त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. बाहेर जाण्यास मार्गच नसल्याने तो एका वर्गात लपून बसला. शेवटी शिक्षकांनी त्याला शोधून बाहेर आणले आणि चोप दिला.

३. रात्री उशिरा त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. (शाळेच्या परिसरात अशी अरेरावी करणार्‍या धर्मांधाला कठोर शासन झाले, तर असे अपप्रकार टळतील ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *