मुंबई : हिंदूंच्या देवतांसह अन्य पंथांतील श्रद्धास्थाने, तसेच महंमद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त विधाने केल्यामुळे इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. झाकीर नाईक यांच्यावर भारतात गुन्हे दाखल झालेले आहेत. आतंकवादी कारवायांचा, तसेच ओसामा बिन लादेनचा पुरस्कार केल्याचा ठपका ठेवत इंग्लंड, मलेशिया आणि कॅनडा या देशांमध्ये डॉ. झाकीर नाईक यांच्यावर प्रवेशबंदी केली आहे. त्यात बांगलादेशातील ढाका येथे निष्पाप्यांना मारणार्या आतंकवाद्यांना डॉ. नाईक यांच्याकडून प्रोत्साहन मिळाल्याचे समोर येत आहे. ही अतिशय गंभीर गोष्ट असून डॉ. झाकीर नाईक यांची वादग्रस्त पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, तसेच त्यांना मिळणार्या आर्थिक स्रोताची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.
या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की,
१. डॉ. झाकीर नाईक हे जाहीर सभा, दूरचित्रवाहिन्या आणि आता इंटरनेटच्या माध्यमातून हिंदु धर्म, देवता, धर्मग्रंथ यांची विटंबना करत आहेत.
२. भारतात डॉ. झाकीर नाईक यांच्या पीस टीव्ही या वाहिनीवर राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचवणारे विषय प्रसारित केल्याने तत्कालीन काँग्रेस शासनाने बंदी घातलेली आहे; मात्र असे असतांनाही भारतात अनेक मुसलमानबहुल भागांत पीस टीव्हीचे राजरोसपणे प्रक्षेपण चालू असल्याचे दिसून येते.
३. महाराष्ट्रात सोलापूर येथेही असे अनधिकृत प्रक्षेपण चालू होते. त्या विरोधात समितीने तक्रार नोंदवलेली आहे. पीस टीव्ही अनधिकृतपणे दाखवणार्या केबल चालकांवरती राज्यशासनाने तात्काळ कारवाई करावी.
४. ढाका येथील आतंकवादी कृत्य करणार्या मुसलमान युवकांना डॉ. झाकीर नाईक याचे प्रोत्साहन असल्याचे समोर आल्याने भारतासाठी हे अतिशय धोकादायक आहे. आधीच भारतातील अनेक मुसलमान युवक आणि युवती हे इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी जात आहेत. कदाचित् त्यांना प्रोत्साहन देण्यामागेसुद्धा डॉ. झाकीर नाईक असू शकतात. त्यामुळे डॉ. नाईक आणि त्याच्या संस्थेची पाळेमुळे खणून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे.
झाकीर नाईकवर बंदी घाला ! – शिवसेना
जर तुम्ही शांतीच्या गोष्टी करत लोकांना जिहादसाठी प्रवृत्त करत असाल, तर ते गैर आहे. या विरोधात कडवटपणे उभे राहिले पाहिजे. मुसलमानांनी त्यासाठी उभे राहिले, कारण त्यांची मुले यात जात आहेत. त्याच्यापासून देशाला धोका आहे. आधीच आपल्याकडे ओवैसीची पिलावळ आहे. झाकीर नाईकवर बंदी घातली पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे खासदार श्री. अरविंद सावंत यांनी केली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात