Menu Close

डॉ. झाकीर नाईक हे धर्माचा चुकीचा प्रचार करत आहेत ! – अमीर खान

अमीर खानला हे इतकी वर्षे का लक्षात आले नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

मुंबई : कोणताही धर्म हा आतंकवाद शिकवत नाही. आतंकवाद आणि धर्माचा संबंध लावला जाऊ नये. झाकीर धर्माचा चुकीचा प्रचार करत आहे. प्रेम हाच धर्माचा प्रमुख संदेश असतो. मुसलमान, हिंदु, शीख, ख्रिस्ती धर्मातील प्रत्येकजण त्याच्या धर्मासाठी काहीतरी करत असतो. जे लोक आतंकवाद पसरवतात आणि जे लोक आतंकवाद करतात त्यांना धर्माशी काही देणे-घेणे नसते. मग ते कोणत्याही धर्माचे असो, असे प्रतिपादन अभिनेता अमीर खान याने एका पत्रकार परिषदेते केले. (अमीर खान याने सर्व आतंकवादी एकाच धर्माचे का असतात, ते आतंकवादी का होतात, याचे उत्तरही दिले पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

आझाद मैदानात दंगल घडवणार्‍या आणि हिंदूंच्या मुळावर उठलेल्या रझा अकादमीचे मुंबईत दिखाऊ आंदोलन !

रझा अकादमीने मुंबईत डॉ. झाकीर नाईक यांच्याविरोधात आंदोलन केले आणि त्यांच्यावर बंदी घालण्याची मागणी केली. त्याचा निषेध म्हणून त्यांनी हिरव्या पटट्या दंडाला बांधल्या. (दंगल घडवणार्‍या रझा अकादमीचा साळसूदपणा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *