Menu Close

इस्लाम जेथेही गेला, तेथे विध्वंस झाला ! – आशा शर्मा, नेत्या, राष्ट्रीय सेविका समिती

rashtra_sevika_samiti

नवी देहली : इस्लाम हा धर्म नसून राजकीय षड्यंत्र आहे. इस्लाम जेथेही गेला, तेथे विध्वंस सोबत घेऊन गेला आहे, हा इतिहास आपण नाकारू शकत नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महिला शाखा राष्ट्रीय सेविका समितीच्या नेत्या आशा शर्मा यांनी देहली येथील आतंकवाद एक समस्या या कार्यक्रमात केले. या वेळी लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन उपस्थित होत्या.

प्रसिद्धी माध्यमांतून प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार शर्मा पुढे म्हणाल्या, आजही मुसलमानांची विचारसरणी तीच आहे. जेथे त्यांची लोकसंख्या १० टक्के असते, तेथे ते शांत असतात. १५ टक्के झाले, तर आपले म्हणणे सांगून गप्प करतील. त्यांची संख्या २५ टक्के झाली की इतरांनी त्यांची गोष्ट मान्य करावी, यासाठी प्रयत्न करतील आणि त्याहून अधिक वाढले, तर कोणाचेच ऐकणार नाहीत. इस्लाम शिक्षणाच्या कमतरतेमुळे अस्तित्वात आला आणि ख्रिस्ती धर्म गरिबीमुळे ! जेथे शिक्षण आहे, तेथे इस्लाम नाही, जेथे जेथे शिक्षणाचे प्रमाण वाढत आहे, जेथे समृद्धी आली आहे, तेथे हे दोन्ही धर्म हळूहळू न्यून होतात. गरिबी दूर झाली, तर ख्रिश्‍चॅनिटीचा प्रभाव हळूहळू अल्प होत जाईल, असेही शर्मा यांनी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *