- संत सुधारणावादी म्हणजे पुरोगामी होते, असे सांगून समाजाची दिशाभूल करणार्या अंनिसच्या या नाटकांना भुलू नका !
- ईश्वराला न मानणार्या अंनिसवाल्यांना अखेर दिखाऊपणासाठी का होईना भागवत धर्माची पताका खांद्यावर घेणे भाग पडले !
- नास्तिक अंनिसच्या विचारधारेचा हा घोर पराभवच !
- संतांनी अंधश्रद्धेला विरोध केला म्हणून सांगणारे पुरोगामी संतांनी अनन्य भक्तीभावाने साधना केली, हे जाणीवपूर्वक लक्षात घेत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
पुणे : समाजप्रबोधन करण्याच्या नावाखाली अंनिसने ११ जुलै या दिवशी माळशिरस ते वेळापूर या टप्प्यात वारीमध्ये सहभागी व्हायचे ठरवले आहे. संतांनी त्यांच्या प्रबोधनातून अंधश्रद्धेला विरोध आणि मानवताकेंद्रीत धर्माचा पुरस्कार केल्याचे सांगत अंनिस आणि अन्य समविचारी संघटना, तसेच मुक्ता आणि हमीद दाभोलकर, श्यामसुंदर महाराज सोन्नर, मुस्लिम सत्यशोधक समाजाचे शमसुद्दीन तांबोळी, सुभाष वारे आदी वारीत सहभागी होणार आहेत. (संतमंडळींनी समाजाला धर्म आणि श्रद्धा काय आहे, हे शिकवून अंधश्रद्धेवर ताशेरे ओढले होते. देव न मानणारे तथाकथित पुरोगामी मात्र देव आणि धर्म मिथ्या आहे, असे सांगून स्वतःच अंधश्रद्धा पसरवत आहेत. नास्तिकवादी अंनिसवाल्यांना समाजाने झिडकारले असल्याने जनाधार मिळवण्याचा हा प्रसिद्धीच्या स्टंटबाजीअंतर्गतचा केविलवाणा प्रयत्न आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
अंनिसने याची उत्तरे द्यावीत !
१. ज्या ईश्वराच्या दर्शनाच्या ओढीने कुणालाही निमंत्रण न देता वैष्णवांचा मेळा प्रतिवर्षी लाखांच्या संख्येने वारीमध्ये सहभागी होतो, त्या ईश्राचे अस्तित्व अंनिसला मान्य आहे का ?
२. अंनिसवाले वारकर्यांप्रमाणे पांडुरंगाच्या पाया पडणार का ?
३. देव, संत या संकल्पनाच न मानणार्या लोकांनी ते संतांसारखे समाजप्रबोधनाचे कार्य करत आहेत, असे म्हणणे हे अविवेकी नाही का ?
४. अंधश्रद्धेला विरोध असल्याचे सांगणारे श्रद्धेला आणि धर्माला ठाम पाठिंबा आहे, असे म्हणणार का ?
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात