Menu Close

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे आमदार हमिदुल रहमान यांच्या उपस्थितीत धर्मांधांचे हिंदूंवर आणि रथयात्रेवर आक्रमण !

धर्मांधांना पाठीशी घालणार्‍या ममता(बानो) बॅनर्जी यांच्या राज्यातील असुरक्षित हिंदू ! केंद्रातील सरकार आणि मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना बंगालमधील हिंदूंच्या रक्षणासाठी काहीही करत नाही, हे त्यांच्या पाठीशी असणार्‍या हिंदूंना लज्जास्पद ! दादरी प्रकरणावरून हिंदूंच्या नावाने ऊर बडवणारे आता कुठे आहेत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

बंगालची बांगलादेश होण्याच्या दिशेने मार्गावरील वाटचाल !

bangal_akraman1
धर्मांधांनी केलेली जाळपोळ

कोलकाता : बंगाल राज्यातील उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील रामगंज गावात हिंदूंच्या रथयात्रेवर धर्मांधाच्या जमावाने आक्रमण केले. पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप केला नसल्याने हिंदूंना कोणतेच संरक्षण न मिळाल्याने त्यांनी राष्ट्रीय महामार्ग ३१ वरील वाहतूक रोखून धरली. दुसर्‍या दिवशी शेजारील चोपरा या मुसलमानबहुल गावांत धर्मांधांनी अल्पसंख्य हिंदूंवर बॉम्बद्वारे आक्रमण केले. या वेळी तृणमूल काँग्रेसचे आमदार हमिदुल रहमान हे उपस्थित होते. चोपरा ब्लॉकमध्ये ३२ टक्के हिंदू आहेत, तर शेजारील इस्लामपूर ब्लॉकमध्ये २५ टक्के हिंदू आहेत.

१. धर्मांधांनी हिंदूंची अनेक घरे जाळली आणि संपत्तीची लूट केली. त्यांनी केलेल्या गोळीबारात काही हिंदू घायाळ झाले.

२. तेथील नैनिताल कॉलनी संपूर्णपणे जाळून टाकण्यात आली आणि तेथील संपत्ती लुटून नेण्यात आली.

३. चोपरा गावातील बाजार लुटण्यात आला. तेथील तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनाही या लुटालुटीचा फटका बसला.

४. पोलीस आणि प्रशासन प्रसारमाध्यमांवर दबाव आणून धर्मांधांच्या आक्रमणाची बातमी प्रसारित होणार नाही याची काळजी घेत होते. (यासाठी दबाव आणण्याची काय आवश्यकता ? नाहीतरी ढोंगी निधर्मीवादी प्रसारमाध्यमे हिंदूंवरील आक्रमणांचे वृत्त कधीच देत नाहीत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

bangal_akram_2
आक्रमण करण्यात आलेला रथ

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *