-
महाराष्ट्र शिक्षण मंडळाचा इतिहासद्रोही निर्णय !
-
पुस्तकात अफझलखानवधाचे नव्हे, तर भेटीचे चित्र !
मुंबई : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे (बालभारती) च्या वतीने तयार करण्यात आलेल्या इयत्ता ४ थी च्या (परिसर अभ्यास भाग २, इंग्रजी माध्यम) अंतर्गत शिवछत्रपती पुस्तकातील ४ धडे वगळण्यात आले आहेत. शिवरायांचे सक्षम प्रशासन, शिवरायांची युद्धनीती, जनतेचा राजा शिवाजी आणि प्रेरणेचा जिवंत स्रोत अशी या धड्यांची नावे आहेत. याऐवजी किल्ले आणि नौदल यांचे व्यवस्थापन आणि कल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन हे धडे अंतर्भूत करण्यात आले आहेत. (छत्रपतींच्या इतिहासाचे नवीन धडे घालायचे होते, तर पूर्वीचे काढून का टाकले ? बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात अरुणाचल प्रदेश हा चीनचा भाग दाखवला आहे आणि अशा अनेक घोडचुकाही केल्या आहेत. अशाप्रकारे मनमानी कारभार करणार्या बालभारतीला जनतेनेच खडसवून पाठ्यपुस्तकातील छत्रपतींचा इतिहासाचा वगळलेला भाग पुन्हा पुस्तकात समाविष्ट करण्यास भाग पाडावे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
अफझलखानवधाच्या संदर्भात माहिती देतांना वध करतांनाचे चित्र प्रकाशित करण्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराज अफझलखानाला आलिंगन देण्यास जात आहेत, असे चित्र प्रकाशित करण्यात आले आहे. (काँग्रेसच्या काळात ज्या चुका व्हायच्या तशाच भाजपकडून होणे अपेक्षित नाही. मुलांपर्यंत सत्य इतिहास पोचावा, हीच हिंदूंची अपेक्षा आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात