Menu Close

सनातनला एक आणि डॉ. झाकीर नाईकला वेगळा न्याय का ?

दैनिक सामनाच्या संपादकीयमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा घणाघात !

धर्मांधांच्या विरोधात आणि हिंदुत्वाच्या बाजूने फक्त शिवसेनाच इतक्या उघडपणे बोलू शकते. अन्य पक्ष आणि लोकप्रतिनिधी मात्र मूग गिळून गप्प बसतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

मुंबई : मुंबईसह देशभरात इस्लामिक संमेलने घेऊन झाकीर नाईक माथेफिरू धर्मांधतेचे विष पेरत होता. त्याची तक्रार याआधी शिवसेना, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांनी करूनही कारवाई झाली नाही. सनातन या संस्थेविषयी एक न्याय आणि झाकीरच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनला वेगळा न्याय, हा प्रकार कायद्याचा मुखवटा फाडणारा आहे, असे घणाघाती प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी दैनिक सामनाच्या संपादकीयमधून केले आहे.

यात म्हटले आहे की,

१. सनातनच्या आश्रमात आणि साधकांकडे काही धार्मिक साहित्य मिळाले. ते साहित्य प्रक्षोभक असल्याचा दावा केंद्रीय अन्वेषण विभाग, राष्ट्रीय तपास यंत्रणा, मुंबई-गोव्याचे पोलीस करतात; पण झाकीर नाईकची प्रक्षोभक भाषणे, त्याचे साहित्य म्हणजे सरळ सरळ हिंदुस्थानच्या फुटीरतेला खतपाणी घालणारीच आहेत.

२. प्रत्येक मुसलमानाने आतंकवादी असायलाच पाहिजे, असा शांती संदेश देणार्‍या झाकीर नाईकला एव्हाना बेड्या ठोकून कसाबच्या कोठडीत डांबायला हवे होते. झाकीर नाईकचा जो काही पीस टी.व्ही. म्हणून प्रचार टी.व्ही. आहे, त्यावर जगभरात बंदी घालून त्याची सर्व यंत्रणा कठोरपणे मोडून काढण्याचे धैर्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रातील मोदी सरकार यांनी दाखवायला हवे.

३. झाकीर नाईक म्हणजे कुणी समाजसेवक नाही आणि त्याच्या मनातील हेतू स्पष्ट आहे. पाकिस्तानातून दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमन यांना फरफटत आणण्याच्या वल्गना आता बंद करून झाकीर नाईकसारख्या अस्तनीतील सापांना ठेचले पाहिजे.

४. हैद्राबाद येथे इस्लामिक स्टेटचे जे माथेफिरू पकडले गेले, त्यातील इब्राहिम यजडा याने झाकीर नाईकच्या शिबिरात १० दिवसांचे प्रशिक्षण (ट्रेनिंग) घेतले होते. झाकीरच्या शिबिरातील हे शांतता कार्य असेल, तर अशा बिळांनी हिंदुस्थान साफ भुसभुशीत झाला आहे, हे मान्य केले पाहिजे.

५. देशातील काळा पैसा मोदींचे सरकार आणायचा तेव्हा आणील; पण झाकीर नाईक याच्या महान शांतता कार्यास अर्थपुरवठा करणारे जे कोणी समाजसेवक आहेत, त्यांना सर्वांत आधी सुरुंग लावला पाहिजे.

६. झाकीर नाईक हा सध्या म्हणे विदेशात आहे. हिंदुस्थानात उतरताच त्याला अटक व्हायला हवी. झाकीर नाईकच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर पोलिसांनी ठेवलेला बंदोबस्त हा कराचीतील दाऊदच्या घराबाहेर तेथील पोलिसांनी ठेवलेल्या बंदोबस्ताप्रमाणेच दिसतो. धर्मांध आतंकवादास प्रेरणा देणारे असे लोक जनतेच्या संतापास बळी पडणार असतील, तर सरकारने देशद्रोह्यांचा बचाव करू नये. आमचे हे सांगणे जहाल असले, तरी राष्ट्रीय हित आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी योग्यच आहे.

हिंदुत्ववादी संघटनांच्या छळामागे झाकीर यांचे सैतानी डोके आहे कि काय ?

सनातनसारख्या हिंदुत्ववादी संघटनांचा सध्या जो छळ चालू आहे, तो पहाता डॉ. झाकीर नाईक यांचे सैतानी डोके त्यामागे आहे का ?, अशीही शंका येऊ लागली आहे. आपसारख्या लोकांनी तर सनातनविरोधात उघडलेली मोहीम डॉ. झाकीरविषयी थंड पडली आहे. जणू डॉ. झाकीर हा आपवाल्यांचा झुंजार कार्यकर्ताच आहे, असेही श्री. ठाकरे यांनी पुढे म्हटले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *