रणरागिणी शाखेचे अभिनंदन !
मंगळुरू : मंदिराचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी मंदिरात येतांना महिलांना वस्त्रसंहिता सक्तीची करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेने येथे चालू केलेल्या मोहिमेतील पहिल्याच प्रयत्नाला प्रशंसनीय यश प्राप्त झाले आहे.
मंगळुरू येथील ग्रामदेवता महातोभारा श्री मंगलादेवीच्या मंदिराचे मुख्य विश्वस्त श्री. रामनाथ हेगडे यांना रणरागिणी शाखेने एक निवेदन देऊन त्याद्वारे मंदिरात येतांना महिलांना वस्त्रसंहिता सक्तीची करण्याची विनंती केली होती. श्री. हेगडे यांनी ही गोष्ट मंदिराच्या व्यवस्थापन समितीसमोर विचारार्थ मांडण्याचे आश्वासन दिले होते. या समितीने त्यांच्या ८ जुलै या दिवशी झालेल्या बैठकीत रणरागिणी शाखेने दिलेल्या निवेदनावर सकारात्मक भूमिका घेऊन सर्व भाविकांसाठी वस्त्रसंहिता सक्तीची करण्याची सूचना मंदिराच्या फलकावर लावली. या देवीच्या नावावरूनच मंगळुरू शहराचे नाव ठेवण्यात आले आहे.
मंगळुरू येथील रणरागिणी शाखेला पहिल्याच प्रयत्नाला मिळालेल्या यशाने सदस्यांचा आत्मविश्वास वाढला असून असेच प्रयत्न शहरातील इतर मंदिरात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (मंगळुरू शहरातील आणि कर्नाटक राज्यातील इतर मंदिरांनी श्री मंगलादेवी मंदिराचा आदर्श समोर ठेवून रणरागिणी शाखेनेे प्रारंभ केलेल्या मोहिमेस योग्य प्रतिसाद द्यावा आणि मंदिरांचे पावित्र्य टिकवून ठेवण्यास हातभार लावावा, अशी सर्व हिंदूंची अपेक्षा आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात