देहली येथे एक दिवसाचे धरणे आंदोलन
नवी देहली : पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना जामीन मिळाला नाही, तर देहलीच्या चौकात युनायटेड हिंदु फ्रंट आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्या नेतृत्वाखाली पूज्य बापूजींचे भक्त प्रतिदिन सामूहिक हरि ओमचा जप करतील, अशी घोषणा अखिल भारत हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. चंद्रप्रकाश कौशिक यांनी केली. दारा सेना आणि भारत जागृती मोर्चा यांनी सनातन वैदिक हिंदु धर्म संस्कृतीच्या गुरुपरंपरेच्या रक्षणासाठी जंतरमंतर येथे संयुक्तपणे एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. या वेळी ते बोलत होते.
भारताला पुन्हा परकियांचे दास बनवण्याचे षड्यंत्र ! – श्री. मुकेश जैन, राष्ट्रीय अध्यक्ष, दारा सेना
पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना अटक करणे, हे भारताला पुन्हा परकियांचा दास बनवण्याचे सीआयए आणि त्यांच्या आतंकवादी ख्रिस्ती मिशनर्यांचे षड्यंत्र आहे, तसेच यातील देशद्रोही मिडियाच्या एका मोठ्या गटाला सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांच्या न्यायाधिशांची टोळी साहाय्य करत आहे, असा आरोप धर्मरक्षक दारा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. मुकेश जैन यांनी केला आहे. या लोकांकडून भारताच्या पूर्वोत्तर आणि पूर्वेकडील राज्यांना तोडून एक ख्रिस्ती देश निर्माण करण्याचे षड्यंत्र करण्यात येत आहे. हेच ते लोक आहेत, ज्यांनी स्वामी असीमानंद, साध्वी प्रज्ञासिंह आणि त्यांचे गुरु शंकराचार्य अमृतानन्द सरस्वती, पू. आसारामजी बापू आणि त्यांचे पूत्र संत नारायण साई निर्दोष असतांनाही त्यांना कारागृहात खितपत अडकवून ठेवले आहे, असेही जैन म्हणाले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात