अन्य धर्मियांच्या धर्मगुरूंवर असे निर्बंध लादणे विमान प्राधिकरणाला शक्य झाले असते का ? हिंदू सहिष्णु असल्यामुळेच हिंदूंच्या संतांना असा घोर अवमान सहन करावा लागत आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
संभाजीनगर : श्री साईबाबा यांच्या विरोधात वक्तव्य करणारे स्वामी गोविंदानंद यांना १२ जुलैला रात्री संभाजीनगरच्या विमान प्राधिकरणाने विमानातून त्रिशूळ नेण्यास बंदी केली. या वेळी प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी स्वामी गोविंदानंद यांना ८ फूट उंचीचे त्रिशूळ विमानातून न नेता विमानाच्या मालवाहू भागातून (कार्गो) नेण्याची अनुमती दिली. या वेळी स्वामीजींनी त्रिशूळाला धार्मिक महत्त्व असून ते माझ्यासमवेतच राहील, असे सांगून मालवाहू भागातून नेण्यास नकार दिला. या घटनेमुळे स्वामीजींनी एअर इंडियाच्या विमानाने न जाता चारचाकी वाहनाने मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला.
स्वामी गोविंदानंद हे पोलीस बंदोबस्तात शिर्डी येथे गेले होते. तेथून ते संभाजीनगरला परत आले आणि तेथून मुंबईला विमानाने जाणार होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात