Menu Close

अमरनाथ यात्रा चालू झाली नाही, तर मुसलमानांना हज यात्रेला जाऊ देणार नाही !

हिंदूंवरील आघातांच्या विरोधात वारंवार आवाज उठवणार्‍या शिवसेनेचा हिंदूंना नेहमीच आधार वाटतो ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

शिवसेनेची पुणे येथील आंदोलनात चेतावणी !

pune_shivsena_andolan

पुणे : बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक हा प्रसंगी रस्त्यावर येऊन दोन हात करायला आणि जशास तसे उत्तर द्यायलाही सिद्ध आहे. जर अमरनाथ यात्रा चालू झाली नाही, तर येथून पुढे हज यात्रेला एकाही मुसलमानाला जाऊ देणार नाही, अशी चेतावणी शिवसेनेच्या वतीने ११ जुलै या दिवशी पुणे येथील आंदोलनात देण्यात आली. शिवसेनेच्या वतीने शनिपार चौक येथे अमरनाथ यात्रेवरील बंदीच्या विरोधात आंदोलन घेऊन तीव्र निदर्शने करण्यात आली. आंदोलनात अमरनाथ यात्रेवरील बंदी आणि यात्रेवरील आक्रमण यांचा निषेध करून घोषणा देण्यात आल्या. अमरनाथ यात्रा सुलभतेने चालू व्हावी, याकरता आंदोलनस्थळी अमरनाथची प्रतिकृती म्हणून बर्फाचे शिवलिंग बनवून त्याची पूजा करण्यात आली.

या वेळी शिवसेनेचे शहर संघटक श्री. शाम देशपांडे म्हणाले, पाकिस्तानच्या भ्याड आक्रमणाचा आम्ही निषेध करतो. बुरहान प्रकरणामुळे अमरनाथ यात्रेस जो त्रास होत आहे, तो पाहून सर्वांनाच माननीय बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते. बाळासाहेब म्हणाले होते, अमरनाथ यात्रेला त्रास द्याल, तर हज यात्रेला एकाही मुसलमानाला जाऊ देणार नाही. हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. शिवसेनेचे श्री. विजय ठकारे यांनीही या वेळी संबोधित केले. या आंदोलनास शिवसेनेचे उपशहरप्रमुख, अन्य पदाधिकारी आणि ३०० हून अधिक शिवसैनिक उपस्थित होते.

आंदोलनाच्या वेळी शिवसैनिकांनी दिलेल्या घोषणा

  • अमरनाथ यात्रा आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची !
  • अडवू नका अमरनाथ यात्रा, नाहीतर शिवसैनिक काढतील तुमची अंत्ययात्रा !

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *