Menu Close

सनातनवर बंदी नको : वारकरी संप्रदाय सनातनच्या पाठीशी !

श्री संत सोपानकाका पालखी सोहळ्यात दिंडी समाजाच्या वतीने एकमुखाने ठराव !

hbp_madhav_maharaj
दिंडीच्या बैठकीत ठराव मांडताना ह.भ.प. माधव महाराज शिवणीकर (उभे असलेले) आणि उपस्थित दिंडीप्रमुख

पंढरपूर : वारकरी संप्रदायातील एखाद्या वारकर्‍याने चोरी केली अथवा दरोडा टाकला, तर संपूर्ण वारकरी संप्रदायावर बंदी आणणार का ? सनातनच्या प्रकरणात जर कोणी दोषी असतील, तर त्यांच्यावर निश्‍चित कारवाई करा; मात्र सनातनवर बंदी घालणे हे अन्यायकारक होईल. वारकरी संप्रदाय सनातनच्या पाठीशी राहील, असे आश्‍वस्त करणारे मत श्री संत सोपानकाका पालखी सोहळ्याचे विद्यमान तिसरे मठाधिपती तथा अध्यक्ष ह.भ.प. राम महाराज कदम यांनी व्यक्त केले. याविषयी ह.भ.प. माधव महाराज शिवणीकर यांनी ठराव मांडला होता. या ठरावास सर्वांनी एकमुखाने संमती दिली. संप्रदायाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि त्यावरील उपाययोजना काढण्यासाठी १३ जुलै या दिवशी वाखरी तळावर ह.भ.प. राम महाराज कदम यांच्या तंबूत बैठक बोलावली होती, त्या वेळी या बैठकीत सनातनवरील संभाव्य बंदीविषयी चर्चा करण्यात आली. त्यानंतर एकमुखाने वरील ठराव करण्यात आला. या वेळी न्यासाचे प्रमुख ह.भ.प. गोपाळ महाराज गोसावी, सोहळा प्रमुख श्रीकांत गोपाळ गोसावी, उपाध्यक्ष ह.भ.प. दशरथ तात्या जगताप, ह.भ.प. ज्ञानेश्‍वर महाराज जळगांवकर, ह.भ.प. धनाजी चोरगे महाराज यांच्यासह सुमारे ८० दिंड्यांचे प्रमुख या वेळी उपस्थित होते.

या वेळी ह.भ.प. माधव महाराज शिवणीकर म्हणाले, सनातन संस्थेच्या साधकांवर गुन्हा सिद्ध झालेला नाही. साधकाने गुन्हा केला असेल, तर त्याला निश्‍चित शिक्षा करा; मात्र पुरोगाम्यांच्या दबावाला आणि मतांच्या राजकारणाला बळी पडून सनातनवर बंदी आणू नये.

ह.भ.प. जळगांवकर महाराज म्हणाले, जे दोषी असतील, त्यांना जरूर शिक्षा करा; पण सनातनवर बंदी नको.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *