Menu Close

बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशीद यांचे स्मरण करण्यासाठी २० जुलैला पावनखिंड मोहीम !

bajiprabhu320कोल्हापूर : हिंदवी स्वराज्यासाठी प्राणार्पण करणारे मावळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे होते. त्यांच्या बळावरच त्यांनी हिंदु राष्ट्राची कल्पना साकार केली. सिद्धी जोहोरच्या गराड्यातून निसटून जाणार्‍या शिवछत्रपतींसाठी शिवरायांच्या वेशात नरवीर शिवा काशीद मृत्यूला सामोरे गेले, तर शेवटचा श्‍वास असेपर्यंत बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंड लढवून ती पावन केली. या सर्वांचा त्याग, पराक्रम, बलीदान जागवण्यासाठी हिंदु जनजागृती समिती प्रतिवर्षी विविध हिंदुत्ववादी संघटना अन् समस्त धर्माभिमानी यांच्या समवेत पावनखिंड मोहीम राबवते. त्यामुळे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्राणार्पण करणार्‍या छत्रपतींच्या वीर मावळ्यांचा आदर्श घेण्यासाठी यंदा ही मोहीम बुधवार, २० जुलै या दिवशी मलकापूर आणि पावनखिंड येथे होत आहे. तरी या मोहिमेसाठी हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरे यांनी केले आहे.

यंदा मोहिमेचे हे ७ वे वर्ष आहे. या मोहिमेचा प्रसार सध्या कोल्हापूर आणि मलकापूर परिसरात चालू आहे. हस्तपत्रके, वैयक्तिक संपर्क, बैठका यांसह फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप अशा माध्यमातूनही हा प्रसार करण्यात येत आहे. प्रतिवर्षी हिंदु नागरिकांचा या कार्यक्रमासाठी उत्साह वाढत असून या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

मोहिमेची रूपरेषा

पालखी सोहळा, मार्गदर्शन : सकाळी १० ते ११.३०
पावनखिंड – १. सकाळी ९ ते ५ : राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांचे प्रदर्शन
२. दुपारी २.३० ते ३.३० बाजीप्रभूंच्या स्मृतीला वंदन, हिंदु राष्ट्र स्थापनेची शपथ आणि मार्गदर्शन

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *