Menu Close

सनातनवरील संभाव्य बंदीच्या विरोधात पुणे येथे मंत्री आणि आमदार यांना निवेदने !

अन्न आणि औषध प्रशासन मंत्री श्री. गिरीष बापट (उजवीकडे) यांना निवेदन देतांना सनातनचे साधक श्री. प्रवीण नाईक
आमदार माधुरी मिसाळ (उजवीकडे)यांना निवेदन देतांना सनातनचे साधक
मदार श्री. योगेश टिळेकर (उजवीकडे)यांना निवेदन देतांना सनातनचे साधक

पुणे : पुरोगाम्यांच्या दबावापोटी, तसेच हिंदुद्वेषी शक्तींच्या अपप्रचारामुळे सनातन संस्थेवर गेल्या काही वर्षांपासून बंदीची टांगती तलवार आहे. सनातनचे कार्य धर्मनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ आणि पारदर्शक असतांना केवळ हिंदुद्वेषापोटी सनातन संस्थेला लक्ष्य केले जात आहे. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सनातनचे डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक झाल्यानंतर न्याययंत्रणेनेही कोणती टिपणी केली नसतांना पुरोगामी बांडगुळे सनातन संस्थेवर बंदी आणण्याची मागणी करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते आमदारांची भेट घेऊन त्यांना सनातनची न्याय बाजू सांगणारे निवेदन देत आहेत. पुण्यातही पुण्याचे पालकमंत्री, तसेच अन्न आणि औषध प्रशासन मंत्री श्री. गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ आणि आमदार योगेश टिळेकर यांना निवेदने देण्यात आली. या वेळी तिघांनीही विधीमंडळात विषय मांडण्याचे आश्‍वासन दिले.

या वेळी श्रीमती मिसाळ यांनी सनातनची बाजू समजून घेतली. त्या म्हणाल्या, दुर्दैवाने हिंदूच हिंदुत्ववादी संघटनांवर आरोप करत आहेत. सर्वांनी हिंदु म्हणून एकत्र येण्याची आवश्यकता आहे. हिंदु मुलांना लहानपणापासून धर्मशिक्षण मिळायला हवे, तरच त्यांच्यामध्ये धर्माभिमान निर्माण होईल. या वेळी आमदार मिसाळ यांनी स्वतःहून मुख्यमंत्र्यांची भेट होण्यासाठी साहाय्य करण्याचे आश्‍वासन दिले. आमदार लक्ष्मण जगताप यांनाही निवेदन देण्यात आले. या प्रसंगी भाजपचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रसारप्रमुख श्री. एकनाथ पवार, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री पराग गोखले, रघुनाथ ढोबळे उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *