लोकहो, अशा क्रूर आतंकवाद्यांचे इस्लामिक स्टेट म्हणजे इस्लामी राष्ट्र हवे आहे कि वसुधैव कुटुम्बकम् (संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे.) या भावनेने रहाणार्या हिंदूचे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) हवे, हे ठरवा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नीस (फ्रान्स) : येथे १४ जुलैच्या रात्री फ्रान्सचा राष्ट्रीय दिन साजरा होत असतांना फ्रेंच रिवेरा रिसॉर्टमध्ये प्रचंड गर्दीच्या ठिकाणी ३१ वर्षीय आतंकवाद्याने अचानक ट्रक घुसवून शेकडो जणांना चिरडले. यात ८४ जण ठार झाले, तर १०० हून अधिक जण घायाळ झाले. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. प्रतीघंटे ७० कि.मी.च्या वेगाने जवळपास २ कि.मी.पर्यंत हा ट्रक नेण्यात आला. ट्रकमधून गर्दीच्या दिशेने गोळ्या झाडण्याचा आवाज येत असल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली. ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे, बंदुका असल्याची माहिती एका स्थानिक अधिकार्याने दिली. या आतंकवाद्याला पोलिसांनी गोळ्या घालून ठार केले. राष्ट्रपती ओलांद यांनी याला दुजोरा दिला असून आतंकवादी फ्रान्सचा नागरिक असून तो ट्युनिशियन वंशाचा असल्याचे सुरक्षा अधिकार्यांनी सांगितले.
नीसमधील सर्व भारतीय सुखरूप असल्याची माहिती तेथील दूतावासाने दिली आहे. यापूर्वी पॅरिसमध्ये वर्ष २०१५ मध्ये झालेल्या इसिसच्या आक्रमणात १३० जण ठार झाले होते. १४ जुलैला झालेल्या आक्रमणाच्या वेळी एविनोन दौर्यावर असलेले फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रान्सवा ओलांद यांना माहिती मिळताच ते दौरा सोडून फ्रान्समध्ये परतले. या आक्रमणानंतर फ्रान्समधील आणीबाणी आणखी ३ महिन्यांसाठी वाढवण्यात आल्याचे ओलांद यांनी घोषित केले आहे. हे आक्रमण कोणत्या आतंकवादी संघटनेने केले, आतंकवाद्याने हे क्रूर कृत्य का केले, तो कोणत्या संघटनेचा सदस्य होता, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही; मात्र या आक्रमणानंतर इस्लामिक स्टेटच्या समर्थकांनी सामाजिक संकेतस्थळावर जल्लोष केला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी या आक्रमणाचा निषेध केला असून वॉशिंग्टनमधील खासदारांनी एका मिनिटाचे मौन पाळून मृतांना श्रद्धांजली वाहिली.
दु:खद क्षणी भारत फ्रेंच नागरिकांसोबत ! – मोदी
पंतप्रधान मोदी यांनी ट्वीटरद्वारे म्हटले आहे, या क्रूर कृत्याचा मी तीव्र निषेध करतो. या दु:खद प्रसंगी आम्ही पीडितांच्या कुटुंबियांसोबत आहोत. तसेच आक्रमणात घायाळ झालेले लवकरात लवकर बरे होतील, अशी आश व्यक्त करतो. या प्रचंड दु:खद प्रसंगी भारतीय नागरिक फ्रेंच बंधू भगिनींसोबत आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात