बांगलादेशने केवळ पीस नावावरून तेथील अनेक शाळांची चौकशी चालू केली. भारतात मात्र अनेक मदरशांमधून आतंकवादी कारवाया होत असल्याचे सत्य समोर येऊनही सरकारने कधी त्यांची चौकशी केली आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
ढाका : बांगलादेशने पीस नाव असलेल्या शाळांची चौकशी चालू केली आहे. शासनाला या शाळांचा डॉ. झाकीर नाईक यांच्या वादग्रस्त पीस टीव्हीशी संबंध असल्याचा संशय आहे. या शाळा डॉ. नाईक यांच्या विचारांचे अनुसरण करत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येणार आहे.
बीडीन्यूज २४ डॉट कॉम या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार बांगलादेशाची राजधानी ढाका आणि अन्य भागांमध्ये चालत असलेल्या शाळांनी कथितपणे डॉ. नाईक यांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांच्या नावांना पीस जोडले. शासन आता या तथाकथित पीस शाळांच्या उपक्रमांची चौकशी करत आहे. एका अधिकार्याच्या मते बांगलादेशमध्ये २८ शाळांच्या नावांमध्ये पीस आहे. बांगलादेशच्या गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीवरून मंत्रालयाने पीस नावांच्या २० शाळांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात