आषाढी दिंडीच्या निमित्ताने सनातन संस्थेवर होत असलेल्या आरोपांविषयी माहिती देतांना सनातन संस्थेचे साधक, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी विविध दिंड्या, पालखी, मठ, संप्रदाय यांच्या भेटी घेतल्या. या वेळी अनेकांनी सनातन संस्थेच्या कार्याचे कौतुक करून सनातनचे साधक यांचा सन्मान केला. त्यातील काही प्रातिनिधीक सत्कार येथे देत आहोत.
१. पुणे येथील वारकरी सांप्रदाय प्रसारक मंडळ नीरवांगी मुक्कामी असतांना त्यांच्या दिंडीसमोर श्री. सुनील घनवट यांनी विषय मांडला. या वेळी हिंदु जनजागृती समिती संस्कार आणि प्रबोधन यांचे कार्य करत असल्याविषयी दिंडीच्या वतीने श्री. सुनील घनवट यांचा सत्कार करण्यात आला.
२. पंढरपूर संत सोपनकाका पालखी सोहळा दिंडी समाज संघटनेचे अध्यक्ष ह.भ.प. राम महाराज कदम यांनी सनातन संस्थेचे साधक श्री. आप्पासाहेब सांगोलकर यांचा मानचिन्ह आणि श्रीफळ देऊन सत्कार केला.
३. पंढरपूर येथे श्री गुरुबाबासाहेब आजरेकर फडात ह.भ.प. गुरु तुकाराम एकनाथ काळे महाराज यांनी सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांचा सन्मान केला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात