सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी धर्मांधांचे अतीलांगूलचालन केल्यामुळेच त्यांना कायद्याचे भय राहिलेले नाही ! त्यामुळेच ते हिंदूंवर आक्रमण करण्यास धजावतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
- प्रत्युत्तर देणार्या हिंदु विद्यार्थ्याला मारहाण
- मुसलमानबहुल भागात कावड यात्रेवरही आक्रमण
- पोलिसांकडून हिंदु विद्यार्थ्यालाच अटक
राऊरकेला (ओडिशा) : येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते राजेश तिवारी यांचा महाविद्यालयात शिकणारा मुलगा अंकित तिवारी याने फेसबूकवर श्रीरामाविषयी केलेल्या पोस्टवर त्याचा सहकारी विद्यार्थी महंमद सुभान याने अवमानकारक प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्यावर अंकितने प्रत्युत्तर दिल्यावर सुभान याने १५ धर्मांधांना आणून अंकित याला महाविद्यालयातच मारहाण केली. तसेच पोलिसांनी सुभान आणि धर्मांधांना अटक करण्याऐवजी अंकित यालाच अटक करण्याची घटना १३ जुलैला घडली. (चोर सोडून संन्याशाला फाशी देणारे पोलीस भारताचे कि पाकचे ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या संदर्भात हिंदूंनी केलेल्या आंदोलनाच्या वेळी धर्मांधांनी येथील कावड यात्रेला लक्ष्य करून ती रोखली आणि त्याचा मार्ग पालटण्यास पोलिसांना भाग पाडले. (राज्यातील बिजू जनता दल शासन काय करत आहे ? ओडिशात कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात नसल्याचे हे उदाहरण होय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
१. १३ जुलैला मारहाण झाल्यामुळे अंकित महाविद्यालयातील प्राचार्यांच्या दालनात घुसला. त्या वेळी प्राचार्यांनी हे प्रकरण मिटवले. (प्रकरणाचे गांभीर्य लक्षात न घेता प्राचार्यांनी त्याविषयी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल का नाही केली ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२. दुसर्या दिवशी महाविद्यालयाला सुटी असतांना सुभान याने अंकित याला महाविद्यालयात तडजोड करण्यासाठी बोलावून तेथे धर्माधांच्या साहाय्याने मारहाण केली. (धर्मांधांच्या अशा फसवणुकीपासून सावध रहा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. या मारहाणीची तक्रार पोलीस ठाण्यात करण्याच्या वेळी ३०-४० सशस्त्र धर्मांध पोलीस ठाण्याच्या बाहेर जमा होऊन घोषणा देऊ लागले. या वेळी हिंदूही तेथे जमा झाल्यावर दोघांमध्ये संघर्ष झाला. पोलिसांनी त्यावर नियंत्रण मिळवले. पोलिसांनी अंकित याला कह्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला.
४. येथे विहिंप, बजरंग दल आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना यांच्या कार्यकर्त्यांनी अंकित याला सोडण्याची मागणी केली. त्यावर त्याला दुसर्या दिवशी सोडतो, असे पोलिसांनी सांगितले.
५. याच वेळी येथे निघणार्या जगन्नाथाच्या कावड यात्रेला मुसलमानबहुल नाला रोड येथे धर्मांधांकडून रस्त्यावर जळते टायर टाकून रोखण्यात आले. त्यांनी यात्रेचा मार्ग पालटण्यास पोलिसांवर दबाव आणला. त्यामुळे सर्व हिंदुत्ववादी येथे पोचले.
६. दुसर्या दिवशी अंकित याला न सोडल्यामुळे हिंदुत्ववाद्यांनी पोलीस ठाण्याला घेराव घातल्यावर पोलिसांनी हिंदूंकडून धर्मांधांच्या विरोधात तक्रार आली नसल्याचे सांगितल्यावर हिंदूंनी तक्रार दाखल केली. (पोलिसांनी हे आधीच का सांगितले नाही ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) तसेच अंकित याला जामीनावर सोडले; मात्र तीन दिवसांनंतरही धर्मांधांना अटक करण्यात आलेली नाही.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात