हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनाला लक्षणीय यश
डॉ. झाकीर नाईक यांचा कार्यक्रम रहित करण्यास पोलिसांना भाग पाडणार्या हिंदु धर्माभिमान्यांचे अभिनंदन !
मंगळुरू : हिंदुद्वेष्ट्या डॉ. झाकीर नाईक यांच्या मंगळुरू प्रवेशावर कर्नाटक पोलिसांनी अखेर बंदी आणली आहे. पोलीस आयुक्त एस्. मुरुगन् यांनी ही माहिती दिली. दक्षिण कन्नड सलाफी चळवळ या संघटनेने ३ जानेवारी या दिवशी मंगळुरू येथील नेहरू मैदानावर हिंदुद्वेष्ट्या डॉ. नाईक यांचे भाषण आयोजित केले होते. त्या निमित्त झाकीर नाईक यांचे २ जानेवारी या दिवशी मंगळुरू येथे आगमन होणार होते. त्या विरोधात शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी हिंदु जनजागृती समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले होते. या जनमताचा रेटा बघून पोलिसांनी वरील पाऊल उचलले आहे.
डॉ. झाकीर नाईक हे त्यांच्या भाषणांतून विद्यार्थ्यांना आतंकवादी कारवाया करण्यास उद्युक्त करतात, तसेच इतर धर्मियांविषयी भेदभाव पसरवून केवळ इस्लाम हा एकच धर्म असल्याचाही प्रसार करतात. या कार्यक्रमामुळे शहरातील धार्मिक सलोख्यावर विपरित परिणाम होऊन जातीय दंगली भडकण्याची शक्यता आहे, अशी शंका व्यक्त केली जात आहे. या सर्व परिणामासाठी कर्नाटक शासन उत्तरदायी असेल, अशी चेतावणी हिंदुत्ववादी नेत्यांनी दिली होती.
पोलिसांनी डॉ. नाईक यांच्या प्रवेशावर भा.द.वि.च्या कलम १४४ अन्वये बंदी घातली आहे. ही बंदी ३१ डिसेंबर ते ६ जानेवारी २०१६ पर्यंत लागू असणार आहे. आवश्यकता वाटल्यास या बंदीची मर्यादाही वाढवण्यात येणार आहे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
बजरंग दलाचे कर्नाटकच्या दक्षिण विभागाचे समन्वयक यांनी विश्व हिंदु परिषदेचे नेते डॉ. प्रवीण तोगाडिया यांची एक बैठक याच काळात मंगळुरू येथे आयोजित केली होती. या बैठकीत गोहत्या, लव्ह जिहाद आणि हिंदुत्ववादी नेत्यांवरील आक्रमणे इत्यादी विषयांवर चर्चा होणार होती; मात्र पोलिसांनी डॉ. तोगाडिया यांच्याही मंगळुरू प्रवेशावर बंदी घातली आहे. ( गोहत्या, लव्ह जिहाद आणि हिंदुत्ववादी नेत्यांवरील आक्रमणे यांविषयी आम्ही काहीही करणार नाही आणि हिंदुत्ववाद्यांनाही काही करू देणार नाही, या वृत्तीचे पोलीस ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात )
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
हिंदुद्वेष्टे डॉ. झाकीर नाईक यांचा मंगळुरू येथील कार्यक्रम रहित करा !
२६ डिसेंबर २०१५
बेंगळुरू येथे हिंदु जनजागृती समितीची पत्रकार परिषद
बेंगळुरू : राज्यातील दक्षिण कन्नड जिल्हा हा अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखला जातो. त्यामुळे वादग्रस्त आणि जिहादी आतंकवादाला खतपाणी घालणार्या डॉ. झाकीर नाईक यांच्या कार्यक्रमाला शासनाने अनुमती देऊ नये, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. या परिषदेला सर्वश्री उच्च न्यायालयाचे अधिवक्ता अमृतेश एन्.पी., अधिवक्ता श्री. शशीकुमार, अधिवक्ता श्री. विवेक सिंह, धर्माभिमानी श्री. मंजुनाथ हिंदु जनजागृती समितीचे मोहन गौडा आणि सनातन संस्थेचे श्री. हर्षवर्धन शेट्टी उपस्थित होते.