Menu Close

सनातनवर बंदीचा विचार कराल तर समस्त हिंदुत्ववादी संघटना आणि वारकरी संप्रदाय तीव्र आंदोलन करेल ! – ह.भ.प. कोकरे महाराज

भारतीय संस्कृतीचे पालन करणारी प्रत्येक संस्था सनातनच्या पाठीशी !

hbp_kokre_maharaj
ह.भ.प. कोकरे महाराज

सनातनवर बंदी आणण्याकरिता पुरोगाम्यांनी आणि हिंदु धर्म संपवण्याचे षड्यंत्र रचणार्‍या संस्था, संघटना यांनी समाजवादाचा पुरोगामी बुरखा परिधान करून हिंदु धर्मामध्ये देव, देश आणि धर्म यांविषयी लोकांच्या मनात जागृती निर्माण करून अनादी काळापासून वैदिक सनातन भारतीय संस्कृती जोपासण्याचे ईश्‍वरी कार्य करणारी सनातन संस्था यांच्यावर बंदी आणण्याच्या संदर्भात प्रसारमाध्यमे आणि कथित पुरोगामित्व समाजात रुजवणार्‍या काही मंडळी यांच्याकडून ऐकायला मिळते. या देशामध्ये आदिअनादी काळापासून वैदिक संस्कृती आजपर्यंत चालत आलेली आहे आणि ती पुढे टिकवण्याकरिता प्रात:स्मरणीय परात्पर गुरु श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या रूपात परमेश्‍वराने या भारत देशामध्ये सनातन संस्था नावाचा उघडलेला धर्मदरबार आहे. त्यामध्ये प्रत्यक्षात साधकांची संख्या जरी काहीशी अल्प असली, तरी भारतीय संस्कृतीचे पालन करणारी प्रत्येक संस्था आणि संघटना सनातनच्या पाठीशी आहे.

….तर वारकरी संप्रदाय आणि हिंदुत्ववादी तीव्र आंदोलन छेडतील !

एखाद्या संस्थेमध्ये असणार्‍या साधकाच्या संख्येवर लक्ष ठेवून जर शासनाने सनातनवर बंदी घालण्याचा विचार केला, तर या महाराष्ट्रातील, देशातील संपूर्ण हिंदुत्ववादी, राष्ट्रप्रेमी संघटना एकत्र येऊन या विषयाचे तीव्र आंदोलन छेडतील. या देशात हिंदुत्ववादी सत्ता यावी म्हणून वारकरी संप्रदाय आणि सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी प्राणाची बाजी लावून ही सत्ता भाजप शासनाच्या हातात दिली आहे. ती केवळ हिंदु धर्म टिकावा आणि हिंदुु धर्माचे रक्षण करणार्‍या संस्थांना राजाश्रय मिळावा याकरिता. सनातन संस्था हिंदु धर्माचा आशेचा किरण आहे. सनातन संस्था देशभक्ती, राष्ट्रभक्ती आणि सात्त्विक धर्मशिक्षण देते. यामुळे ती आमची केंद्रबिंदू आहे. शासन सनातन संस्थेवर बंदी आणण्याचा विचार कुणाच्या दबावाखाली करणार नाही, असा आम्हाला विश्‍वास आहे.

लोकांच्या मनातील धर्मप्रेम आणि राष्ट्रभक्ती मारू शकत नाही !

सनातन संदर्भात जे झालेले आरोप प्रत्यारोप आहेत त्या सर्व गोष्टी न्यायालय योग्य त्या पद्धतीने हाताळेल. एखाद्या आमदारांनी किंवा मंत्र्यांनी भ्रष्टाचार केल्यास ही संपूर्ण संघटना किंवा पक्ष बरखास्त केला जात नाही, मग केवळ खोटेनाटे आरोप करून हिंदु धर्माची मानहानी करणार्‍यांचे ऐकून सनातनवर बंदी घालण्याची भाषा सरकारमधील काही प्रतिनिधी का करतात ? जर असे झाल्यास केवळ सनातन संस्था या नावावर बंदी घातल्याने लोकांच्या मनातील धर्मप्रेम, राष्ट्रभक्ती ही कोणी मारू शकत नाही किंवा बंदी घालू शकत नाही. म्हणून आमचा समस्त वारकरी संप्रदायाचा शासनाला निर्वाणीचा संदेश आहे की, आपण या देशामध्ये वैदिक जनास संस्कृती जोपासण्याचे कार्य करावे. ती संपवण्याचे कार्य करणार्‍यांना पाठिंबा देऊ नये. त्यांना पाठिंबा देणार्‍या काँग्रेस अन् राष्ट्रवादीच्या सरकारची काय अवस्था झाली आहे, हे आपण पहातच आहोत.

धर्मांधांची संख्या वाढली की हिंदू सुरक्षित राहू शकत नाहीत !

आज ज्या गावामध्ये शंभर हिंदूंची घरे आहेत त्या ठिकाणी एक मुसलमान दादागिरी करून गुण्यागोविंदाने कोणत्याही प्रकारचे मानहानी न होता आनंदात जगतो. जर सनातन आतंकवाद पसरवत असती तर अशा लोकांचे काय झाले असते ? पण ज्या ठिकाणी १०० मुसलमानांची घरे त्या ठिकाणी ९० हिंदूसुद्धा सुरक्षित राहू शकत नाहीत. आज मालेगाव, साकी, पिंपळनेर, मिरज, जळगाव, चोपडा, मुजफ्फरनगर अशा देशातील अनेक भागांमध्ये जातीय दंगली होतात. या दंगलींना प्रारंभ कोण करते यांच्या मुळापर्यंत जाऊन शासनाने चौकशी करावी. मग या राष्ट्रातील आतंकवादी संघटना कोणती आहे ती हिंदु आहे की मुसलमान आहे, ते शासनाला कळेल.

सनातनवर बंदीची मागणी करणार्‍या संघटना झाकीर नाईकचा प्रश्‍न आल्यावर गप्प का ?

आज झाकीर नाईक जे काही इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनच्या नावाने नक्षल्यांच्या मनात विष पेरत आहेत. पीस टी.व्ही. सारखी वाहिनी देशामधील सामाजिक एकात्मतेला तडा जाईल, असे काम करून आतंकवादी निर्माण करत आहे. अशा विषारी जहर ओकणार्‍या आतंकवादी निर्माण करणार्‍या देशद्रोह्यांच्या विरोधात शासनाने कठोर पावले उचलावीत, ही समस्त देशवासियांची मागणी आहे. आज आम्ही कोणत्या धर्मावर टीका करत नाही; पंरतु वस्तुस्थिती मांडायला हरकत नाही. शासनानेसुद्धा याचा विचार करावा. सनातनवर बंदीसाठी कांगावा करणार्‍या काँग्रेस, राष्ट्रवादी डाव्या विचारांच्या संघटना सनातनवर बंदी घालावी, असा कांगावा करणार्‍या संघटना या आज झाकीर नाईकचा प्रश्‍न आल्यावर गप्प का ? हा प्रश्‍नही समस्त हिंदुत्ववाद्यांच्या मनात खदखदत आहे. त्याचे उत्तरही त्यांना एक दिवस द्यावे लागेल. मतांच्या राजकारणासाठी तसेच पुरोगाम्यांच्या दबावाला बळी पडून शासनाने सनातनवर बंदी आणू नये. सामान्य हिंदूंच्या मनात देव, देश, धर्म यांविषयी अविरत प्रेम आहे, हे शासनाने विसरू नये.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *