Menu Close

पीडीपी-भाजप सरकारचे अपयश ; काश्मीरमधून आणखी ३०० हिंदूंचे पलायन !

दादरीवरून, घरवापसीवरून ऊर बडवणारे निधर्मीवादी यावर तोंड का उघडत नाहीत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

kashmir-hindu.jpg.pagespeed.ce.UVw-TTFX9jजम्मू : काश्मीरमधून ३०० हिंदूंनी पलायन केल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर आणखी ३०० हिंदूंनी पलायन केल्याचे समोर आले आहे. हे सर्व हिंदू काश्मीर खोरे सोडून जम्मूमध्ये आले आहेत. हे सर्व ६०० हिंदू राज्य आणि केंद्र सरकारचे कर्मचारी आहेत. राज्य सरकारच्या अधिकार्‍यांनी काश्मीर सोडून गेलेल्या कर्मचार्‍यांची संख्या सांगण्यास नकार दिला. तरीही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १ सहस्र ६७३ पैकी वरील ६०० हिंदू कर्मचार्‍यांनी काश्मीर सोडले आहे. या सर्वांना पंतप्रधान योजनेच्या अंतर्गत येथे नोकरी देण्यात आली होती. (सरकारला काश्मीरमधील हिंदूंना मरू द्यायचे आहे म्हणून त्यांना योग्य सुरक्षा न पुरवताच तेथे नोकरी दिली, असेच म्हणावे लागेल ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) गेल्या १० दिवसांपासून चालू असलेल्या हिंसाचारामुळे या हिंदूंनी पलायन केले आहे. काश्मीरच्या शरणार्थी शिबिरात ते रहात होते. जम्मूमध्ये पसरलेले कर्मचारी साहाय्य केंद्राच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करत आहेत. त्यांना जम्मूमध्येही नोकरी दिली जावी, अशी ते मागणी करत आहेत.

१. श्रीनगरहून आलेल्या सुषमा भट्ट जम्मू-कश्मीर राज्याच्या शिक्षण खात्यात काम करतात. त्यांनी सांगितले की, शरणार्थी शिबिरात १०० काश्मिरी पंडित परिवार रहात होते. आता तेथे कोणी नाही. सुषमा आणि त्यांचे पती यांनी १९९० मध्ये काश्मीर सोडले होते त्यानंतर २०१० मध्ये ते प्रथमच येथे आले होते.

२. सुषमा भट्ट यांनी सांगितले की, जेव्हा आम्ही काश्मीरमध्ये परतलो होतो, तेव्हा पाकिस्तानच्या क्रिकेट संघाने सामना जिंकल्यावर अथवा हरल्यावर, तसेच दिवाळी सारख्या सणांच्या वेळी आमच्या घरांवर दगड फेकले जात होते. आताच्या हिंसाचारात दंगलखोरांनी अनेकदा आमच्या शिबिरात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आमच्यावर पेट्रोल बॉम्ब फेकले. यात त्यांचा २ वर्षांचा मुलगा घायाळ झाला. त्यामुळे आम्ही काश्मीर सोडण्याचा निर्णय घेतला.

३. शिक्षक संजय पंडित यांनी सांगितले की, वानी ठार झाल्यानंतर अवघ्या ५ मिनिटांत येथे हिंसाचाराला प्रारंभ झाला. मशिदींवरील ध्वनीक्षेपकांवरून हिंसाचाराचे आवाहन करण्यात आले. (काश्मीरमध्ये कोण हिंसाचार करते हे जगजाहीर आहे, हे परत परत अशा घटनांतून समोर येऊनही याविरोधात देशातील एकही राजकीय पक्ष अथवा निधर्मीवादी बोलत नाहीत ! सनातनवर बंदीची मागणी करणारे या मशिदींना टाळे ठोकण्याची मागणी का करत नाहीत ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *