Menu Close

स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही खरा इतिहास दडपण्याचा प्रयत्न – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

भरपावसात २५० हून अधिक हिंदु धर्माभिमान्यांनी जागवले बाजीप्रभूंचे बलीदान !

वीर शिवा काशीद यांचे १३ वे वंशज आनंदराव काशीद यांची विशेष उपस्थिती

फेरीच्या समारोपप्रसंगी बोलतांना डावीकडून सर्वश्री पंडितराव विभूते, सुनील घनवट, मनोज खाड्ये आणि गोलामध्ये आनंदराव काशीद
फेरीच्या समारोपप्रसंगी बोलतांना डावीकडून सर्वश्री पंडितराव विभूते,
सुनील घनवट, मनोज खाड्ये आणि गोलामध्ये आनंदराव काशीद

मलकापूर (जिल्हा कोल्हापूर) – देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशात आक्रमक औरंगजेब याच्या नावाने जिल्हा आहे; पण धर्मासाठी बलीदान देणार्‍या छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा जिल्हा नाही. आजही हिंदूंचा अनन्वित छळ करणारे अकबर, हुमायू, तसेच अनेक आक्रमक यांची नावे शहरांना, मार्गांना जशीच्या तशी आहेत. हाच प्रकार इतिहासाच्या अभ्यासक्रमाच्या बाबतीतही चालू आहे. आजच्या निधर्मी शिक्षण विभागाने छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा कोथळा काढलेले छायाचित्र काढून टाकून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफझलखान यांच्या भेटीचे छायाचित्र समाविष्ट केले आहे. त्यामुळे दुर्दैवाने स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही खरा इतिहास दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा प्रयत्न आपण सर्वांनी रोखला पाहिजे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. मलकापूर येथे बाजीप्रभू देशपांडे यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या पालखी मिरवणुकीनंतर उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

आतंकवादाला तोंड देण्यासाठी व्यक्तीद्वेष, जाती-धर्म यांना बाजूला ठेवून हिंदु म्हणून एकत्र या ! – पंडितराव विभूते

या वेळी बोलतांना मलकापूर येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. पंडितराव विभूते म्हणाले, आतंकवादाला तोंड देण्यासाठी व्यक्ती, व्यक्तीद्वेष, जाती-धर्म यांना बाजूला ठेवून हिंदू म्हणून एकत्र या अन्यथा काळ आणि भविष्य आपल्याला क्षमा करणार नाही. हे राष्ट्रकार्य परमार्थ समजून आपण एकत्र आले पाहिजे. शूरवीर यांचे बलीदान लक्षात ठेवून किमान त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे.

लक्षावधी वर्षांची परंपरा असणारा भारत आज इतिहास विसरत आहे ! – आनंदराव काशीद, शिवा काशीद यांचे १३ वे वंशज

भारतीय संस्कृतीला, हिंदु धर्माला लक्षावधी वर्षांची परंपरा आहे. ही प्राचीन संस्कृती, धर्म आपण आज विसरत आहोत. याउलट ज्या धर्मांना दोन-तीन सहस्र वर्षांपेक्षा अधिक इतिहास नाही, अशा ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मांनी अनुक्रमे ५६ आणि १०४ राष्ट्रे स्वतःच्या अधिपत्याखाली आणली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासातून पुष्कळ शिकण्यासारखे आहे; मात्र आपण त्यातून काही घेण्यास तयार नाही. इतिहासाचा अभ्यास करणाराच भविष्य घडवू शकतो. त्यामुळे आपणही आज छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीकारक यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कृती करूया.

स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *