सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने भांडुप येथे आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवाला ४८२ धर्माभिमानी उपस्थित !
मुंबई – आज जगात अधर्माचा अंधःकार वाढत असून भारत या अंधकारात लोटला जाता आहे. हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी प्रत्येकाने अन्यायाच्या विरोधात कृती केली पाहिजे. ज्याप्रकारे गुरु-शिष्य परंपरा समाजाला साधनेकडे नेते. त्याप्रमाणे जेव्हा धर्माला ग्लानी येते, तेव्हा गुरु-शिष्य परंपराच धर्म प्रस्थापित करते, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी केले. १९ जुलै या दिवशी भांडुप जैनम बँक्वेट सभागृहात हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था आयोजित संयुक्त गुरुपोर्णिमा महोत्सवात ते बोलत होते.
या वेळी हिंदू विधीज्ञ परिषदेचे श्री. विक्रम भावे, हिंदु जनजागृती समिती प्रणीत रणरागिणी शाखेच्या मुंबई संघटक सौ. मनाली नाईक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सोहळ्याला भाविक आणि हिंदुत्ववादी मिळून ५०० जिज्ञासू उपस्थित होते. मुलुंडचे नगरसेवक श्री. प्रकाश गंगाधरे, विश्व हिंदू परिषदेचे भांडुप विभाग अध्यक्ष श्री. भाऊ बागवे, उद्योजक श्री. गणेश उपाध्याय, पंचमुखी सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री. जगन्नाथ कदम, शिवसेना शाखाप्रमुख श्री. उमेश माने हेही उपस्थित होते. प्रारंभी सनातनचे साधक दापत्य श्री. विजय आणि सौ. राणी सरगर यांच्या हस्ते गुरुपूजन झाले. पुरोहित श्री. मयुरेश गोडबोले यांनी पौरोहित्य केले.
स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात